Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शाहरूख खानच्या ‘पठाण’ चा दमदार टीझर प्रदर्शित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 

मुंबई, 25, ऑक्टोबर :-  बाॅलिवूडचा किंग अर्थात शाहरूख खान येत्या नवीन वर्षात तीन धमाकेदार चित्रपट घेउन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच शाहरूखच्या ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. जवळपास चार वर्षांनंतर शाहरूख मुख्य भुमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2018 मध्ये त्याचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्याने बराच काळ चित्रपटांपासून ब्रेक घेतला. आता ‘पठाण’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी उत्सूकता अधिक वाढली आहे. दिवाळीनिमित्त किंग खान ने त्याच्या चाहत्यांना ही भेट दिली आहे.

‘पठाण’हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता ‘प्रतीक्षा संपली… पठाणचा टीझर रिलीज’ झाला असे कॅप्शन देत हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. सिध्दार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ या चित्रपटात शाहरूखसोबतच दिपिका पादुकोण आणि जाॅन अब्राहम यांच्याही भूमिका आहेत. याआधी शाहरूख आणि दिपिकाची जोडी ‘ओम शांती ओम’ आणि चेन्नई एक्स्प्रेसमध्ये पहावयास मिळाली होती. या जोडीला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पठाणशिवाय शाहरूखचा ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे दोन चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांची शुटिंग भारतात आणि स्पेनमध्ये झाली आहे. ‘पठाण’ मध्ये शाहरूखचा वेगळा लूक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या झिरो या चित्रपटात शाहरूखसोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांनी भुमिका साकारल्या होत्या. मात्र हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप ठरला. त्यामुळे पठाणमधून शाहरूख दमदार कमबॅक करेल का अशी उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आदिवासी समाजाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशिल

रोहित शर्मा सह स्टार खेळाडूं सरावासाठी उतरले मैदानात

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.