लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
बल्लारपुर, 05 सप्टेंबर – बल्लारपुर तालुक्यात बालविवाहाची सूचना प्राप्त होताच जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या दक्षतेमुळे बालविवाह रोखण्यास यश प्राप्त झाले. बालविवाहाची माहिती प्राप्त होताच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी आणि रुदय संस्थेचे क्षेत्रीय अधिकारी शशीकांत मोकाशे यांच्या माध्यमातून लग्न स्थळ गाठण्यात आले. त्या ठिकाणी 200 लोकांच्या उपस्थितीत बालविवाह सोहळा सुरू असतांना लग्न मंडपात गावाच्या सरपंचासह हस्तक्षेप करून बालविवाह थांबविण्यात आला. तसेच उपस्थित नागरिकांचे बालविवाह कायद्याबाबत समुपदेशन करण्यात आले.
बालविवाहाचे दुष्परिणाम, होणाऱ्या शिक्षेची तरतुद, बालिकेच्या जिवनात होणारे वाईट परिणाम, यावर सखोल मार्गदर्शन सदर बालविवाह थांबविण्यात यश आले. यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर बल्लारशहा पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक श्रीमती नैताम व त्यांचे सहकारी, गावातील सरपंच, प्रतिष्ठीत मान्यवर व बालविवाह कायद्यावर काम करणारे शशीकांत मोकाशे उपस्थित होते.

Comments are closed.