Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला १००० कोटी दिले तर महाराष्ट्राला २००० कोटी द्यावेत – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २३ मे : तौक्ते चक्रीवादळा मुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कोकण दौऱ्यावर आले होते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात अनेक बंदराना त्यांनी भेटी दिल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या भेटीत अनेक मच्छीमाराचं झालेलं नुकसान, अनेक बोटीचं झालेलं नुकसान तसेच देवगड बंदरात तीन मच्छीमार मृत्युमुखी पडले. अनेक ठिकाणी भातशेती खराब झाली, अनेक ठिकाणी आंबा, नारळ, सुपारी या फळबागाच नुकसान झालं आहे. या सर्व झालेल्या नुकसानीची भरीव मदत मिळावी या पद्धतीची भूमिका ते शासनाकडे मांडणार आहेत.

त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे गुजरात ला १ हजार कोटी दिले तर महाराष्ट्राला २ हजार कोटी मिळतील. अशी अपेक्षा नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त केली. मोदी यांनी तातडीने हेलिकॉप्टरमधून गुजरातला फिरून १ हजार कोटी रुपये दिलेत तसाच एक हवाई दौरा महाराष्ट्रात करून तातडीने २ हजार कोटी द्यावेत. ही नम्र विनंती मोदींना आहे. असे ते पुढे म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबईचं गव्हर्नर ऑफिस हे भाजपचं कार्यालय झालं आहे. हे होता गमा नये, कारण राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. त्याला सगळ्यांचे काम ओढण्याचा अधिकार असतो. म्हणून राज्यपाल महोदयांना विनंती आहे की या सर्व प्रकरणावर पडदा पाडावा आणि 12 MLC चि जी नाव पाठवली त्यांना मान्यता द्यावी. अशी मागणी पटोले यांनी यावेळी केली आहे.

हे देखील वाचा :

दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन दिवसात निर्णय – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

ब्लॅक फंगसचा धोका नेमका कोणत्या रुग्णांना?

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.