Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खासगी बस वाहतूकदारांना 100 टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना मास्क सॅनिटायझरचा वापर करावा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क:- राज्यात खासगी बसमधून १०० टक्के प्रवासी आणि पर्यटक वाहतुकीला संमती देण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय होताच परिवहन आयुक्तालयाने बससाठी कार्यपद्धतीही जाहीर केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणं हे खासगी वाहतुकीसाठी सक्तीचं असणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्र मोटर वाहन नियम १९८९ च्या नियम २० (१) मधील तरतुदीनुसार वाहनाच्या प्रत्येक चालकाने वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणं बंधनकारक आहे. त्यानुसार कंत्राटी बसच्या चालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक किंवा प्रवासी गट बदलताना तसेच प्रवासाच्या प्रत्येक दिवशी प्रत्येक फेरी अंती प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे.

काय आहेत नियम?

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

  • बसचे आरक्षण कक्ष/कार्यालय, चौकशी कक्ष यांचीही वेळोवेळी स्वच्छता करावी. तसंच या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणं, सॅनेटायझर वापरणं आवश्यक, बस उभ्या राहतात त्या ठिकाणी गर्दी न होऊ देण्याची काळजी घेणं आवश्यक.
  • बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गन द्वारे तपासणी करण्यात यावी. एखाद्या व्यक्तीस ताप, सर्दी-खोकला इत्यादी कोविडची लक्षणं दिसत असल्यास त्या प्रवाशास बसमधून प्रवास करण्यास प्रतिबंध करावा.
  • सर्व प्रकारच्या खासगी, कंत्राटी बस वाहनांमधून १०० टक्के क्षमतेने वाहतुकीस संमती.
  • चालकाने प्रवासादरम्यान जेवण, अल्पोपहार, प्रसाधन गृहाचा वापर यासाठी बस थांबवल्यास त्या थांब्यावरीरल ही सर्व ठिकाणे स्वच्छ असल्याची खातरजमा करावी.
  • बससमध्ये चढताना आणि उतरताना तसेच खानपान व प्रसाधनगृहाच्या वापरासाठी उतरताना प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक.
  • प्रवाशांनी बसमध्ये कोणताही कचरा फेकू नये, कचरा फेकण्यासाठी कचराकुंडीचाच वापर करावा.
  • बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मास्क बंधनकारक, सॅनेटायझरही सक्तीचे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.