Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सीसीआयकडून खरेदी केंद्र मंजूर : हमी भावाने कापूस विकण्याचा मार्ग मोकळा !

शेतकऱ्याची आर्थिक लूट थांबणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली :  दि. २६ डिसेंबर, गडचिरोली हा भाताचा जिल्हा म्हणुन प्रसिद्ध आहे. यामध्ये  नैसर्गिक साधनसंपत्ती व गौण खानिजसाठा भरपूर प्रमाणात उपलब्ध्य आहे. त्यामुळे या जिल्हयात कापूस उत्पादक शेतकरी फार कमी प्रमाणात आहे.

चामोर्शी व एटापल्ली तालुक्यात बंगाली बांधव मोठया प्रमाणात वास्त्यव्यास असून ते नगदी पिकाकडे वळले आहे. कापूस हे नगदी पीक आहे. त्यामुळे चामोर्शी व  गडचिरोली तालुक्यातील काही भाग तसेच  अहेरी, मुलचेरा, सिरोंचा व एटापल्लीतील काही शेतकरी कापसाची लागवड करतात.  कापूस उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली  असूनही  जिल्ह्यात  एकही खरेदी केंद्र सीसीआयने मंजूर केले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लुट होत होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात एकही हमीभाव कापूस खरेदी केंद्र नसल्याने खासगी व्यापारी कवडीमोल दराने कापूस खरेदी करत होते. साडेसात हजार रुपये क्विंटल  हमीभाव असताना व्यापारी शेतकऱ्यांकडून साडेसहा हजार रुपये क्विंटल एवढ्या कमी भावाने कापूस खरेदी करून शेतकऱ्याची क्विंटलमागे एक हजार रुपयांपर्यंत आर्थिक लुट करीत होते. चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने वेळोवेळी  कापूस खरेदी केंद्र मंजूर करण्यासाठी शासणाकडे पाठपुरावा केला होता. परंतु त्यांना यश आले नाही.

त्यानंतर २७ डिसेंबरला रोजी  राज्य सहकारी पणन महासंघाचे संचालक श्री. अतुल गण्यारपवार यांनी आष्टी येथे रास्ता रोको आंदोलनाची तयारी केली होती. त्यानंतर वेगाने सूत्रे हलली असून अखेर चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने मागणी केलेल्या प्रमाणे  कापूस खरेदी केंद्र मंजूर झाल्याचे पत्र सीसीआयचे महाव्यवस्थापक नीरज कुमार यांनी पाठवले. त्यामुळेले कापूस उत्पादक शेतकऱ्यांना  दिलासा मिळालेला असून हमी दराने कापूस विकता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे ही वाचा,

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नामंकित इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश

 

LIC कडे आहेत 881 कोटी रुपये

 

Comments are closed.