व्यसन सोडा, गावाचे १० लाख रुपये वाचवा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, 14 जून – ग्रामस्थांनी दरवर्षी दारू व तंबाखूचे व्यसन सोडल्यास गावात 10 लाख रुपयांपर्यंत बचत करता येऊ शकते, अशी जागृती भिंतीचित्राच्या माध्यमातून मुक्तीपथ तर्फे करण्यात येत आहे. आरमोरी तालुक्यातील 11 ग्रा.प. मध्ये हा उपक्रम राबवून व्यसनमुक्त होण्याचे आवाहन करण्यात आले व उर्वरित ग्रा.प. मध्ये सुद्धा अशा प्रकारचे भिंतीचित्र रंगविण्याचे नियोजित आहे. जिल्ह्यातील सर्व ४५७ हि ग्रा.प. अंतर्गत अशा प्रकारे जागृती करण्यात येणार आहे. आता पर्यंत कोरची, कुरखेडा, वडसा, धानोरा व चामोर्शी तालुक्यातील सर्व ग्रा.प. मध्ये भिंतीचित्र रंगविण्यात आले आहे.
हे पण वाचा :-
Comments are closed.