Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

9 ऑगस्ट रोजी ‘रानभाजी महोत्सव’

मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अन्यन्य साधारण महत्व

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली – मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अन्यन्य साधारण महत्व आहे. सकस अन्नामध्ये विविधभाज्यांचा समावेश असतो. रानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणा-या रान पालेभाज्या फळभाज्या, कंद भाज्यामध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पोष्ठीक अन्नघटक व औषधी गुणधर्म असतात. तसेचसदर रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनीक किटकनाशके / बुरशीनाशके फवारणी करण्यात येत नसल्यामुळेपुर्णपणे नैसर्गिक असल्याने या संपत्तीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे रानभाज्यांचे आरोग्यविषयक महत्व व माहीतीजास्तीत जास्त ग्रामिण तसेच शहरी भागातील नागरीकांना होणेसाटी व विक्री व्यवस्था करून त्यांचे विक्रीतुन शेतक-यांनाही काहीआर्थीक फायदा होणेसाठी लोकांमध्ये याबाबत जनजागृती स्थानिक नागरीकांना, तसेच शेतकरी बांधवाना रानभाजी ओळख, त्यांचेउपयोग आणी महत्व कळावे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा आत्मा,गडचिरोली कार्यालयाच्या वतीने या वर्षीसुध्दा क्रांती दिनाचे निमित्ताने दिनांक. 09 ऑगस्ट 2024, शुक्रवार रोजी सकाळी 11.00वाजता जिल्हास्तरीय “रानभाजी महोत्सव” कार्यक्रमाचे आयोजन कृषि चिकित्सालय, फळरोपवाटिका, सोनापुर, जि- गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमात विविध प्रकारचे 50 स्टॉल उभारले जाणार असुन त्यात प्रामुख्याने महिला बचत गट / शेतकरी बचतगट / शेतकरी उत्पादक कंपनी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमात रानभाज्या प्रदर्शनासोबत सदर महोत्सवात सहभागीशेतकरी बांधवाना कृषि विभागामधील विविध योजनाची माहीती तसेच शास्त्रज्ञ यांचे चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या महोत्सवात जास्तीत जास्त शेतकरी बचत गट / महिला बचत गट / शेतकरी उत्पादक कंपनी यांनी जास्तीत जास्तसंख्येने या कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन बसवराज मास्तोळी, प्रकल्प संचालक, आत्मा, गडचिरोली यांनी जिल्हातील सर्व शेतकरी बंधु भगिनीना केले आहे.

मराठा-कुणबी मुला-मुलींकरीता सनदी लेखापाल प्रशिक्षण

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.