Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्रात गेल्या ९ महिन्यात १० वर्षांतली विक्रमी परकीय गुंतवणूक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

महाराष्ट्रात गेल्या १० वर्षांतली विक्रमी परकीय गुंतवणूक गेल्या ९ महिन्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावर दिली आहे. केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीनं परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर २०२४ अखेरचा अहवाल जाहीर केला असून, गेल्या १० वर्षांतली सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या ९ महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

२०२४- २०२५ या आर्थिक वर्षात पहिल्या ९ महिन्यात आतापर्यंत एकूण १ कोटी ३९ लाख ४३४ रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे. ही गेल्या १० वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक आहे. या विक्रमासह महायुती सरकारनं आपलाच २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

याबद्दल त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं अभिनंदन केलं आहे. तसंच आपले सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात राज्याची घौडदौड ही अशीच कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.