Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एकलव् निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता इयत्ता 6 वी ते 9 वी साठी निवासी प्रवेशाबाबत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 29, डिसेंबर :- प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी,जि.गडचिरोली यांचे कार्यक्षेत्रा अंतर्गतअहेरी / मुलचेरा/ सिरोंचा हे तीन तालुके येत असून सदर तालुक्यातील इयत्ता 6 वी, 7 वी, 8 वी, 9 वी मध्येप्रवेश घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जामातीच्या विद्यार्थ्याथा करिता एकलव्य रेसिंडेशियल स्कूल,मध्ये प्रवेश घेण्याबाबत इच्छुक पालकांनी विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प कार्यालय,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,अहेरी व शासकीय / अनुदानित / आदिवासी मुला / मुलींचे वसतिगृह येथून विनामुल्य अर्ज प्राप्त करुन दिनांक 3 जानेवारी 2023 पर्यत सादर करावे इयत्ता 6 वी ते 9 प्रवेश मिळण्याकरिता अर्टी व शर्ती पुढील प्रमाणे.

सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छीत विद्याथी अनुसूचित जमातीच्या असावा. पालकांचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले अनुसूचित जमातीच्या दाखल्याची सांक्षाकित प्रत सादर करावी.कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न 6 लक्ष इतके मर्यादित राहील. पालक दारिद्रय रेषेखाली असेल तर त्या संबधाचा दाखला जोडावा. शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये इयत्ता 5 वी तसेच 6 वी ते 8 वी चे वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे निवड स्पर्धा परिक्षेच्या माध्यामातून करण्यात येईल. व गुणवंता धारंक विद्यार्थ्यानाचा प्रवेश देता येईल.खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश कोणतेही वेळी रद्द करण्यात येईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

निवड झालेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चित झाल्या नंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांचा व पाल्यांचा विनंती नुसार शाळा बदलता येणार नाही. याबाबत पालकांनी हमी पत्र सादर करावे.आदिम जमतीच्या विद्यार्थ्यासाठी 5% जगा आरक्षित राहील. तसेच अनुसूचित जमातीच्या दिव्यांग विद्यार्थ्यासाठी 3% जागा आरक्षित राहील.असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.