Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोयारकोठी जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूच्या शोध मोहिमेबाबत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : मौजा-पोयारकोठी जंगल परिसरात, पोलीस स्टेशन कोठी तालुका-एटापल्ली जिल्हा गडचिरोली येथे दिनांक १७ मे २०२० रोजी गडचिरोली जिल्हा अंतर्गत, पोलीस पथक नक्षल शोध मोहिम राबवित असतांना पोयारकोठी, जंगल परिसरात पोलीस व नक्षल यांच्यात झालेल्या गोळीबारात दोन पोलीस मृत्यु झालेले होते.

त्याअनुषंगाने, दोन्ही मृतकाचे दंडाधिकारीय तपास व चौकशी प्रक्रिया, सदर प्रकरणात फौजदार प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १७६ अन्वये दंडाधिकारीय चौकशी सुरु आहे. तरी वरिल घटनेच्या संबधात ज्यांना निवेदन करावयाचे आहे, प्रतिज्ञापत्र सादर करावयाचे आहे त्यांनी १५ दिवसांचे आंत किंवा ८ जुन २०२१ पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली हयाचे न्यायालयात स्वत: उपस्थित राहून कार्यालयीन वेळेत दाखल करावे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

माहिती देणाऱ्या व्यक्तीबाबत त्याचे विनंतीवरुन गोपनियता बाळगण्यात येईल असे मनुज जिंदल सहाय्यक जिल्हाधिकारी तथा, उप विभागीय अधिकारी, एटापल्ली यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बनावट लग्न लावून पैसे उकळणारी टोळी गजाआड

कोरोनाचा उगम चीन देशातल्या वुहानच्या प्रयोग शाळेतूनच

Comments are closed.