Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दूरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवास स्थानांची कामे तातडीने पूर्ण करावीत – गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  

मुंबई डेस्क, दि. 17 जून : राज्यातील दुरावस्थेत असलेल्या पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचारी यांची निवासस्थाने, नव्याने उभारण्यात येणाऱ्या पोलिस चौक्या व निवासस्थाने यांची कामे प्राधान्यक्रम ठरवून तातडीने सुरू करण्याचे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले आहे.

मंत्रालयातील दालनात राज्यातील पोलिसांची निवासस्थाने व पोलिस ठाणे यांच्या समस्या संदर्भातील बैठकीत शंभुराज देसाई बोलत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार प्रतापराव जाधव, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक (नियोजन) एस जगन्नाथन, पोलिस महासंचालक (गृहनिर्माण) विवेक फणसळकर, गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट, औरंगाबाद, नांदेड, अमरावती विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दूरदृश्यप्रणालीव्दारे या बैठकीला उपस्थित होते.

यावेळी लोकप्रतिनिधीनी मतदार संघात नव्याने पोलीस स्थानके व निवासस्थानांची मागणी केली. पैठण तालुक्यातील विहामांडवा पोलिस ठाणे, पैठण पोलिस चौकी (नाथ मंदिराजवळ), पैठण पोलीस चौकी (शेगांव सिमा), आडुळ पोलीस चौकी, दावरवाडी येथे पोलिस चौक्या स्थापन करणे, सिल्लोडसोयगांव येथे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान बांधकाम करणे, डोणगांव, जानेफळ, लोणार, साखरखेर्डा येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी निवासस्थान, व बॅरेक बांधकामकरणे, बेल्हा आऊट पोस्टचे उन्नतीकरण करून नवीन पोलीस स्टेशन निर्माण करणे, नांदेड जिल्हयातील लिंबगाव पोलिस स्टेशन अंतर्गत पासदगांव (आसाना नदीजवळ), खडकपुरा (वाघीहसापुर रोड) येथे दोन पोलिस चौक्या निर्माण करणे, जिंती, ता. करमाळा येथे नवीन पोलिस स्टेशनची निर्मिती करणे, बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील धाडवरायपुर येथे नवीन इमारत बांधकाम करणे आदी कामांबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, गृह विभागाने राज्यातील अशा प्रकारे येणा-या मागण्या लक्षात घेवून, एखादी इमारत अगदी दुरावस्थेत असेल तर तातडीने जी कामे करावयाची आहेत, त्या कामांना सर्व प्राथमिक स्वरूपातील प्रस्ताव मंजुरी घेवून तातडीने काम सुरू करावे, असे निर्देश शंभुराज देसाई यांनी दिले. ज्याठिकाणी जिल्हा नियोजन मधून या कामांसाठी निधी मिळू शकतो तो देखील घेण्यासंबधीत प्रशासनाने कार्यवाही करावी.

हे देखील वाचा :

आ. गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय पोलिसांच्या रडारवर

सेना भवनसमोर राडा, शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.