Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूरच्या धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटवा – रविकिरण समर्थ

सामाजिक कार्यकर्ते रविकिरण समर्थ यांची मागणी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. सदर निर्णय स्वागताहार्य असून चंद्रपूरच्या धर्तीवर गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी तात्काळ हटविण्यात यावी अशी मागणी भाजपा ओबीसी आघाडी सेल चे माजी जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रविकिरण समर्थ यांनी केली आहे.

गेल्या तीन दशकापासून म्हणजे १९९३ पासून आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली. मात्र या दारूबंदीचा काहीएक फायदा जिल्ह्याला झाला नाही. उलट गडचिरोली जिल्ह्यात दारू विक्रीचे प्रमाण मोठय प्रमाणात वाढले आहे. या अवैद्य दारूविक्री मुळे गडचिरोली जिल्ह्यातील काना- कोपऱ्यात मोठया प्रमाणात आवैद्यपने दारू विकली जात आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात अवैध मार्गाने जेव्हा पाहिजे तेव्हा दारू सहज उपलब्ध होत असल्याने अनेक शाळकरी विद्यार्थ्यांपासून तर मोठया माणसापर्यंत दारूचे व्यसन वाढलेले आहे त्यामुळे युवा पिढी दारूच्या आहारी जाऊन गारद होण्याची भीती आहे. विषारी दारूमुळे आजपर्यत कित्येक लोकांना आपला जिवही गमवावा लागला.

अवैद्य दारू विक्रीच्या व्यवसायात महिलाही मागे राहिल्या नाही. गडचिरोली जिल्ह्यात बंदी असतानाही दारूविक्रीचे सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कुठली दारूबंदी आहे? हे कळायला मार्ग नाही. केवळ कागदावर असलेल्या दारूबंदीचा उपयोग काय?.अवैद्य दारूविक्री मुळे विशिष्ट लोकांचे पोट भरले जात आहे. मात्र दारूबंदी मुळे शासनाला दरवर्षी मिळणारा कोट्यवधी चा मिळणारा महसूलही बुडाला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकासाला खीळ बसली आहे. पर्यटन थांबले व उद्योगलाही त्याचा फटका बसला. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी दारूबंदी उठविणे एकच पर्याय आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तिन दशकापासून गडचिरोली जिल्ह्यावर लादलेल्या दारूबंदी मुळे जिल्ह्याचा कोणता फायदा झाला. याचे चिंतन, मंथन  व विचार करण्याची आज गरज आहे.  राज्य शासनाने चंद्रपूर ची दारूबंदी हटविण्याचा निर्णय घेतला. मग गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी का हटविण्यात आली नाही. गडचिरोली सारख्या आदिवासी मागास जिल्ह्याने कोणते पाप केले?.असा प्रश्नही रविकिरण समर्थ यांनी उपस्थित केला.

चंद्रपूर च्या धर्तीवर गडचिरोली जिल्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय राज्य शासनाने तात्काळ घ्यावा व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी ने सदर मागणी उचलुन धरावी व गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्यला दारूबंदीतुन मुक्त करावे अशी मागणी भाजपा ओबीसी सेल चे माजी जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रविकिरण समर्थ यांनी केली आहे.

हे देखील वाचा :

जिल्ह्यातील दारु बंदी उठवून मोहफुलावर आधारित दारू कारखाना सुरू करा – रामकृष्ण मडावी

मोहफुल उत्पादनातून आदिवासींचे जीवनमान उंचावणार – आदिवासी विकास मंत्री ऍड. के.सी. पाडवी

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.