Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली शहरातील फुलेवार्डातील मृत कोंबड्यांचे बर्ड फ्ल्यूबाबतचे अहवाल सकारात्मक

Get real time updates directly on you device, subscribe now.

नागरिकांनी घाबरून न जाता बर्ड फ्ल्यूबाबत सतकर्ता बाळगावी जिल्हाधिकारी दीपक सिंगला

  • फुले वार्डामधील 1 किमी त्रिज्येचे क्षेत्र संसर्ग क्षेत्र म्हणून घोषित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली,दि.19 जानेवारी : गडचिरोली शहरातील फुलेवार्डातील मृत कोंबड्यांचे बर्ड फ्ल्यू बाबतचे अहवाल सकारात्मक आल्यानंतर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक सतकर्ता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

मागील काही दिवसात महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी बर्ड फ्लू आजाराने कोंबडया दगावल्याचे आढळुन आले. त्यानंतर गडचिरोली शहरातील फुलेवार्डातील कुक्कटपालन करणाऱ्या व्यावसायिकाच्या काही कोंबडया मृत झाल्याचे आढळून आले. सदर मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. सदर अहवाल आज सकारात्मक असल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण करणे करीता जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी मौजे फुले वार्ड, गडचिरोली, ता.जि.गडचिरोली येथील संबंधित व्यावसयिकच्या घराचे प्रक्षेत्र येथील कुक्कुटवर्गीय पक्षी बर्ड फ्लू रोगाने मर्तुक झाल्याने बाधित क्षेत्रास संसर्ग क्षेत्र म्हणून जाहीर केले. त्याठिकाणी केंद्रबिंदू धरून १ किमी त्रिज्येचे संसर्ग क्षेत्र म्हणून तसेच १० किमी त्रिज्येचे सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करून प्रतिबंधित करण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

फुले वार्ड, गडचिरोली, ता.जि.गडचिरोली येथील संबंधित व्यावसायिकाच्या प्रक्षेत्रापासून १ ते १० किमी त्रिज्येतील परिसरामधून कुक्कुट पक्ष्यांची बाहेर जाणारी वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शन, अंडी, कुक्कुटखत यास प्रतिबंध घालण्यात येत आहे. तथापि ०-१ किमी बाधित क्षेत्र वगळून १ ते १० किमी क्षेत्रात निरोगी कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्री करण्यास मुभा असेल. तसेच सदरच्या सर्वेक्षण क्षेत्रातंर्गत तालुका गडचिरोली हद्दीतील कोटगल, इंदाळा, कनेरी, पुलखल, मुडझा, नवेगाव, सेमाना, वाकडी, कृपाळा, मसेली, शिरपूर चेक, विहिरगाव, चांदाळा, बोदली, मेंढा, बामणी, जेप्रा, मुरखळा, उसेगाव, मजोरी, दिभना, राजगट्टा चेक, राजगट्टामाल, खरपुंडी, माडे तुकुम, गोगाव, कुऱ्हाडी, कोंढाणा, चुरचुरा व साखरा ही सर्व गावे पुढील आदेश हाईपर्यंत सर्व्हेक्षण क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आली आहेत. सदर भागात बर्ड-फ्ल्यु नियंत्रण संदर्भाने आवश्यक उचित कार्यवाही पशुसंवर्धन विभागाने करणे बाबत जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी आदेश दिले आहेत.

एविएन इन्फ्लूएंजा ओ.आय.ई. प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त : फुले वार्डातील मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी एविएन इन्फ्लूएंजा ओ.आय.ई. प्रयोगशाळा भोपाळ येथे पाठविण्यात आले होते. सदर प्रयोगशाळेकडून कडून अहवाल प्राप्त झाले ते सकारात्मक आले आहेत. एकुण 16 जिल्हयातील नमुने तपासणीसाठी देण्यात आले होते. त्यातील गडचिरोलीसह इतर 8 जिल्हयातील बर्ड फ्ल्यू बाबतचे अहवाल सकारात्मक आले आहेत.

जिल्हा व तालुकास्तरावर बर्ड फ्ल्यू संक्रमण नियंत्रणासाठी समितीची स्थापना : बर्ड फ्ल्यू बाबत होणारा संसर्ग रोखण्यासाठी व त्यावर आवश्यक उपाययोजना तात्काळ राबविण्यासाठी जिल्हा तसेच तालुका निहाय समित्यांची स्थापना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय प्राणीजन्य आजार समिती यांनी केली आहे. यामध्ये अध्यक्ष हे जिल्हाधिकारी तर सदस्यांमध्ये पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, उप वनसंरक्षक गडचिरोली, अधिक्षक अभियंता सार्व.बांधकाम, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी तसेच इतर महत्वाकाच्या विभाग प्रमुखांचा समावेश आहे. तसेच तालुका स्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली विविध तालुका अधिकाऱ्यांचा  समावेश करण्यात आला आहे.

त्या जीवत व मृत कोंबडयांची विल्हेवाट शास्त्रीय पध्दतीने :  बर्ड फ्ल्यू हा आजार केवळ पक्षांमध्ये होत असतो. सदर संसर्ग  मनुष्यामध्ये होण्याचे प्रमाण फारच दुर्मिळ असते. तरीसुध्दा खबरदारी आणि बर्ड फ्ल्यू चा संसर्ग मोठया प्रमाणात पसरू नये म्हणून फुले वार्डातील कुक्कुटपालना मधील मृत कोंबड्या व इतर जीवीत कोंबडयांची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावण्यासाठी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांचे शीघ्र कृती दल स्थापन करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.