Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुल येथील वार्ड क्रमांक १२ येथील रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करण्यासाठी उलगुलान संघटनेचे मुख्याधिकारी यांना निवेदन.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

मुल, दि. २ डिसेंबर: मुल नगरपरिषदे अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक १२, सावरकर वार्ड येथे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. नागोसे यांच्या घरापासून ठेव नखाते यांच्या घरापर्यंत रोडचे बांधकाम सुरू असून त्याठिकाणी रस्त्याचे बांधकाम निकृष्ट होत आहे असे तेथील नागरिकांनी उलगुलान संघटनेला सांगितले. तात्काळ उलगुलान संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संबंधित रस्त्याच्या बांधकामाची पाहणी केली असता त्याठिकाणी दबाई बरोबर झालेली नसल्याचे आढळले.GSB सहा इंच दबाई करण्याचा नियम असताना त्या ठिकाणी चारच इंच दबाई करण्यात आली होती. रस्त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट होतानाचे आढळून आले. संबंधित ठेकेदाराच्या सुपरवायझरला विचारणा केली असताना त्यांनी उलगुलान संघटनेच्या पदाधीकाऱ्यांना उद्धटपणे उत्तरे दिली. याठिकाणी जनतेची व प्रशासनाची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे तरी या भ्रष्टाचाराची चौकशी तात्काळ करण्यात यावी यासाठी उलगुलान संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मुल यांना निवेदन दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संबंधित रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करून तात्काळ संबंधित ठेकेदारावर कारवाई केली नाही तर उलगुलान संघटना तीव्र आंदोलन करणार असा इशारा संघटनेद्वारे देण्यात आला. निवेदन देताना उलगुलान संघटनेचे शाखा अध्यक्ष निखिल वाढई उपाध्यक्ष प्रणित पाल, आकाश येसनकर, सुजित खोब्रागडे, रोहित शेंडे, अक्षय दुमावार, वतन चिकाटे तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.