Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वेलगुरात जि.प शाळा व धर्मराव हायस्कूल तर्फे “संकल्प रॅली”

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी, 7 ऑक्टोंबर :देशातील 500 आकांक्षीत तालुक्यांच्या विकासासाठी “संकल्प सप्ताह” या साप्ताहिक कार्यक्रमाची पायाभरणी “संकल्प ते सिद्धी” तत्त्वानुसार झाली. याच्या उद्दिष्टपूर्तीत सहभाग म्हणून अहेरी पंचायत समितीतील वेलगूर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व राजे धर्मराव हायस्कूल वेलगुर यांनी संकल्प रॅली काढून सप्ताहामध्ये सहभाग घेतला.

सदर तीन ते नऊ ऑक्टोबर दरम्यानच्या सप्ताहात आकांक्षीत तालुक्यात प्रत्येक दिवस एक विशिष्ट विकास संकल्पनेवर आधारित असेल. संपूर्ण आरोग्य, सुपोषित कुटुंब, स्वच्छता, शेती, शिक्षण व समृद्ध दिवस यांचा संकल्प या दिवशी करावयाचा आहे. याच अनुषंगाने वेलगुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व राजे धर्मराव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून सातही दिवस संकल्प करण्याचा प्रयत्न केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दोन्ही शाळेतील मुलामुलींनी अनेक विषयांवरील घोषवाक्याचा जयघोष करून जनजागृती केली.
यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव मडावी,कुमरे, येल्लेवार,आचेकर, खांडेकर, कुसणाके तथा राजे धर्मराव शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर भुते, प्रशांत कुंडू, नंदकिशोर झोडे, विजय दंडारे, संजय गरमाडे,सरकार इत्यादी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.