Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपूरात 31 मार्च पर्यंत निर्बंध कायम – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर डेस्क, दि. २० मार्च: नागपूरात ३१ मार्च पर्यंत कडक निर्बंध कायम राहतील अशी माहिती नागपुर जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज नागपुर येथे दिली. कोरोना आजारा संदर्भात आज नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालय येथे सर्व पक्षीय बैठक आयोजीत करण्यात आलेली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बैठक संपल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले. यात काही नियम शिथिल करण्यात आलेले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता पूर्वी १ वाजेपर्यंत हे निर्बंध होते ते आता ४ वाजेपर्यंत करण्यात आलेले आहे. भाजीपाला, फळे, किराणा दुकान, ठोक दुकान आता ४ वाजेपर्यंत राहणार आहेत.

Comments are closed.