Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 23 जानेवारी : जिल्ह्यात लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या अवैध दारू तस्करीबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, याबाबत सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी विशेष लक्ष केंद्रीत करून कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कायदा व सुव्यवस्था संबंधात काल चंद्रपूर पोलीस मुख्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी गृह मंत्री देशमुख बोलत होते. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, रस्ते महामार्गच्या पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सागर डोमकर, उपअधिक्षक शेखर देशमुख, तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.

गृहमंत्री देशमुख यांनी यावेळी जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव, कोविड नियंत्रण परिस्थिती, लसीकरण आदि विषयांबाबत माहिती घेवून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत आरोग्य यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सुचना केल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सुरवातील जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा व कामगिरीची माहिती दिली. खुन व खुनाचा प्रयत्न यासारखे गुन्ह्यात दोषसिद्धीमध्ये चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातून दुसरा असल्याचे तर सेशन व जे.एम.एफ.सी. कोर्ट दोषसिद्धीमध्ये सातवा असल्यसाचे त्यांनी सांगितले. तसेच पोलीस प्रशासनातर्फे महिला विरूद्ध गुन्हे तपासाकरिता एकूण नऊ पोक्सो गुन्हे तपास पथक गठीत केल्याचे व पोलीस सारथी उपक्रम व भरोसा सेल यासारखे उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.