Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खा. अशोक नेतेंनी घेतला धानोरा तालुक्यातील कोविड परिस्थितीचा आढावा

नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे अधिकाऱ्यांना आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

धानोरा : दि. ५ मे : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज दि ५ मे रोजी धानोरा तालुक्यात दौरा करून तालुक्यातील कोविड स्थितीचा आढावा घेतला.

यावेळी भाजप आदिवासी मोर्चा चे प्रदेश महामंत्री प्रकाशजी गेडाम, भाजपचे तालुका अध्यक्ष शशिकांतजी साळवे, ज्येष्ठ नेते साईनाथजी साळवे, तालुका महामंत्री विजय कुमरे, तहसीलदार पितूलवार, ठाणेदार विवेक अहिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ सावसाकडे, नगर पंचायत चे मुख्याधिकारी बेंबरे, भाजपचे संजय कुंडू, सारंग साळवे, करीम अजानी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी खासदार अशोक नेते यांनी कोविडचा आढावा घेतला असता धानोरा तालुका हा आदिवासी बहुल क्षेत्र असल्याने दुर्गम भागातील नागरिक लसीकरण करण्यासाठी समोर येत नाही तसेच कोविड तपासणी करण्यासाठी नकार देत असल्याने त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याची गरज आहे अशी माहिती तहसीलदार व आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी खासदार अशोक नेते यांनी गावागावात जनजागृती शिबीर घेऊन लसीकरण व कोविड तपासणी साठी नागरिकांना जागृत करण्याचे निर्देश दिले. तसेच सध्या कोविड ची स्थिती भयावह असल्याने अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्याचे निर्देश यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिले.

यावेळी खासदार अशोक नेते यांनी धानोरा तालुक्यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या कडून प्राप्त झालेली एक ऑक्सिजन कान्सट्रेटर मशीन दिली व याचा चांगला उपयोग करून रुग्णांना योग्य सेवा देण्याचे सांगितले. यावेळी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

गडचिरोली जिल्ह्यात १८ मृत्यूसह ५८६ नवीन कोरोना बाधित तर २५१ कोरोनामुक्त

 

पश्चिम बंगालमधील हिंसाचार हा लोकशाहीवरील सर्वात मोठं संकट: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Comments are closed.