रोज डे ला गुलाबाने खाल्ला भाव, तर निशिगंध देखील तेजीत.
आजच्या भावामुळे व्यापारी समाधानी.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
जालना 7 फेब्रुवारी :- आज ७ फेब्रुवारी म्हणजे रोझ डे आपल्या प्रियजनांना गुलाबाचे फुल देऊन आपल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस.खरं तर या आठवड्यात त्यामुळेच गुलाबाची विक्री वाढते, गुलाब भाव खाऊन जातो सोबत मंद सुवासिक निशिगंध सुध्दा भाव खाऊन जातो.गेल्या २ महिन्यांपासून फुलांच्या बाजारात मंदी आहे.जालना शहरातील फुलांची बाजारपेठ ही प्रसिध्द. येथून गुलाब, निशिगंध, गलांडा जालना जिल्ह्याच्या सीमा ओलांडून शेजारच्या वाशिम, मेहेकर, चिखली, बुलढाणा, मालेगाव पासून पुण्या मुंबईत जातो. त्यामुळे जालना बाजारपेठेत गुलाब भाव खाऊन जातो. पण गेल्या २ महिन्यांपासून या फुल बाजाराला मरगळ आली होती.गुलाबी थंडी संपता संपता प्रेमाच्या भावना व्यक्त करणारा फेब्रुवारी महिना आला आणि गुलाबाच मार्केट वधारल.
लग्नसराईचा मोसम ही सुरू झाल्याने जालना जिल्ह्यातील खणेपुरी, जामवाडी, रोहनवाडी,शेंद्रा या भागातील शेतकऱ्यांनी आपला गुलाब, निशिगंध, गलांडा बाजारात विक्रीसाठी आणला आहे.गेल्या आठवड्यात १५ ते २० रुपयाच्या कवडीमोल भावाने विकला गेलेला गुलाब फेब्रुवारी महिना सुरू होताच ३०,४०,५० वरून आज ७०/८० रुपयांवर येऊन ठेपला.आजच्या रोझ डे च्या पार्श्वभूमीवर कालच गुलाब १०० वर जाऊन आला होता हे विशेष.
आता जसजसा उन्हाळा वाढू लागेल, लग्नसराई मोक्यात येईल मग तसतसा गुलाबाला देखील भाव मिळेल अशी अपेक्षा जालन्यातील व्यापारी त्रिंबक काळे आणि रामेश्वर बोडखे यांनी व्यक्त केली आहे. त्रिंबक काळे यांच्याकडे प्रत्येकी ३० गुंठे जमिनीवर गुलाब आणि निशिगंध लावलेला आहे.आता लग्नसराई सुरू झाल्याने आन आज गुलाब निशिगंधा ला चांगला भाव मिळाल्याने ते समाधानी आहेत. फुलांच्या या बाजारात आज बिजली २० रुपये, गुलाब ७०/८० पर्यंत वधरल्याने व्यापारी समाधानी दिसून येत आहे. हा प्रेमाच्या भावना व्यक्त करणारा आठवडा या गुलाब, निशिगंधा फुल उत्पादकांसाठी चांगले दिवस घेऊन आलाय.
गुलाब उत्पादक शेतकरी या भावात समाधानी असेल तरी यापेक्षही जास्त भाव मिळायला हवा ही त्यांची माफक अपेक्षा.गुलाबाची तोडणी,त्यासाठीचे खते,औषधी,फवारणी ते तोडणी झाल्यावर बाजारपेठेत आणण्यासाठी चा वाहतूक खर्च या सगळ्याच गणित पाहता शेतकरी ज्या अपेक्षा करतो त्याही रास्तच वाटतात. काहीका असेना रोझ डे,प्रेम व्यक्त करण्याच्या या निमित्ताने का होईना गुलाब निशिगंधा विक्रीतून शेतकऱ्याच्या पदरात २ पैशे जास्त पडताहेत हे महत्वाचं.
हे पण वाचा :-
Comments are closed.