Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एस.पी.चंद्रपूर यांच्या नावाने असलेल्या फेसबुकची दुसरी बनावट फेसबुक आयडी तयार करुण गंडा घालण्याचा प्रयत्न.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

चंद्रपूर, दि. १७ नोव्हेंबर: एस.पी.चंद्रपूर यांच्या नावाने असलेल्या फेसबुक आयडीची प्रोफाइल फोटोची कॉपी करुण दुसरे फेसबुक खाते तयार करून त्यांच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून आर्थिक अडचण असल्याचे भासवून गुगल पे, फोन पे द्वारे पैसे पाठवण्यास विनंती करीत असल्याची माहिती पोलीस विभागाला प्राप्त होताच पोलीस ठाणे रामनगर येथे अज्ञात इसमा विरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हाची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू केला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली आहे.   

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जगभरात कोविड-१९ चा काळात जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. सोशल मीडियाच्या सहाय्याने बनावट प्रोफाइल तयार करून पैशाच्या मागणीकरिता व्हाट्सअप चॅटिंग, ट्विटरद्वारे ब्लॅकमेलिंग, ऑनलाइन वाँलेट, क्रेडिट कार्ड केवायसी, नोकरीचे आमिष दाखवून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे. लाँकडाऊन मुळे अनेक नागरीकांच्या रोजगार हिरावल्याने आधीच अडचणी असतांना पैसे काढून देण्याचे आश्वासन घरबसल्या देत असून फसवणूक करीत आहे.

पोलिस विभागाच्या सायबर सेल सतर्क राहण्यासाठी केले आवाहन.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

  • कोणत्याही सोशल मीडियावर आलेल्या बातम्या, फेसबुक आयडी,
    व्हाट्सअप यांना खात्री केल्याशिवाय स्वीकारू नये.
  • मुला मुलींचे मीडियावर फोटो टाकताना काळजी घ्यावे. वैयक्तिक संवेदनशील माहिती कुणालाही शेअर करू नये.

  • जिल्हा पोलीस विभागाकडून वारंवार देत असलेल्या माहिती संदर्भात आपण गंभीरतेने दखल घ्यायची आहे.

  • पोलीस विभागाकडून सायबर आठवडा सुरू करण्यात आलेला आहे. त्यासंबंधाची सायबर गुन्ह्यात फसवणूक झाल्यास जवळील पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्याचे कळविण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.