Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सचिन वाझे अग्रिम जामिनावर 30 मार्च रोजी सुनावणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  

मुंबई डेस्क, दि. १९ मार्च: ठाणे कोर्टाचे 9 क्रमांक मध्ये आज सचिन वाजे यांच्या खटल्या संदर्भात सुनावणी झाली. ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरेन मर्डर प्रकरणात सचिन वाजे यांच्या वकिलांनी सचिन वाजे यांच्या जामिनासाठी 12 मार्च रोजी कोर्टाकडे अर्ज केला पण त्यावेळी त्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला होता.

आज 19 मार्च रोजी कोर्टाने सचिन वाजे यांच्या अटकपूर्व जामिनासाठी पुढील तारीख 30 मार्च दिली आहे. दरम्यान एटीएसने आता न्यायालयात आपल्या वतीने आवश्यक असलेल्या माहितीची प्रत सादर केली आणि वाझे यांचा ताबा आपल्याला पुढील तपासासाठी मिळावा असा अर्ज केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावर सचिन वाजे यांच्या वकिलाने कोर्टात अशी विनंती केली की, ही कागदपत्रे वाचण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे , त्यासोबतच सचिन वाझे यांच्या बहिणीने माध्यमांद्वारे मानसिक छळ केला जात असून या प्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती न्यायालयात केली, ही बाब गंभीर आहे माध्यमांनी संयम पाळावा असं कोर्टाने स्पष्ट केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.