Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

साईनाथ पवार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार २०२५

दिव्यांग क्षेत्रातील निष्ठावान, समर्पित आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या वतीने हा सन्मान जाहीर करण्यात आला...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रोहा : दिव्यांग व्यक्तींच्या हक्क, पुनर्वसन आणि सामाजिक न्यायासाठी सातत्याने कार्य करणारे समाजकल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद (अलिबाग) येथील कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष साईनाथ पवार यांना यंदाचा मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. दिव्यांग क्षेत्रातील त्यांच्या निष्ठावान, समर्पित आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या वतीने हा सन्मान जाहीर करण्यात आला.

मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे २५ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ मराठी अभिनेते अरुण नलावडे यांच्या हस्ते साईनाथ पवार यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध क्षेत्रांतील दिग्गजांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

साईनाथ पवार हे अनेक वर्षांपासून दिव्यांग व्यक्तींच्या समस्या, त्यांच्या हक्कांसाठीची लढाई, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आणि सामाजिक समावेशन यासाठी सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेक दिव्यांगांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला असून, समाजात संवेदनशीलतेची जाणीव वाढण्यास मदत झाली आहे.

या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे रोहा व रायगड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, सहकार्य अपंग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष इरफान मुल्ला, सचिव शिवाजी पाटील, उपाध्यक्ष संदीप बारस्कार, रोहा तालुकाध्यक्ष सुनील झोलगे, सचिव प्रविण मोरे, तळा तालुकाध्यक्ष किशोर पितळे, कैलास जंगम, नामदेव कोदे, नवनाथ सुटे, गोरख बाबरे, प्रविणा म्हस्कर, संतोष निकम यांच्यासह विविध दिव्यांग संघटना व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी साईनाथ पवार यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.