Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आर्चीच्या कार्यक्रमात नागरिक झाले सैराट; 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नांदेड, 21 फेब्रुवारी : आर्चीचे एन्ट्री म्हटली की नागरिक सैराट होणार हे नक्की. मात्र कोरोनाच्या काळात हाच प्रकार सहा जणांना महागात पडला आहे. सैराट चित्रपटानंतर आर्ची-परश्याची जोडी लोकांनी डोक्यावर उचलून घेतली. आजही ही जोडी कोणत्या कार्यक्रमात हजेरी लावणार असल्याचं कळतं तरी मोठी गर्दी जमा होते. मात्र चाहत्यांचं हे वेड कोरोनाला पूरक ठरू शकतं, याचा विसर पडल्याचं दिसत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोविड नियमांचे पालन न केल्याने नांदेडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहूर तालुक्यातील सारखणी येथे लेंगी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कोरोना प्रतिबंधात्मक नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लेंगी महोत्सवाला सैराट फ्रेम आर्चीला म्हणजेच रिंकू राजगुरू हिला बोलावल्यात आलं होतं. 16 फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आर्चीला पाहण्यासाठी  मोठी गर्दी जमा झाली होती. या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी मास्कचा वापर केला नव्हता, असं चित्र आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नव्हते. याबाबत किनवट तालुका महसूल विभागाच्या वतीने सिंदखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यानुसार एकूण सहा आयोजकांवर सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक नियम आणि भादंवीच्या कलम 188, 269, 270 आणि 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी कोरोना नियम पायदळी तुडविण्यात येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.