Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सांगली जिल्ह्यातील सोनी येथे तरुणाचा धारदार हत्याराने डोक्यात वार करुन हत्या

ग्रामपंचायत निवडणूकीदरम्यान राष्ट्रवादी समर्थकाच्या खूनाच्या घटनेमुळे खळबळ

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मिरज 13, डिसेंबर :-  सोनी ता.मिरज येथे मंगळवारी मध्यरात्री आकाश माणीक नरुटे वय 22 या तरुणाचा धारदार हत्याराने डोक्यात वार करुन हत्या करण्यांत आला. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

सोनी गावात ग्रामपंचायत निवडणूक सुरु असून राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रचारात असलेल्या आकाश यास दोघांनी बोलावून दुचाकीवर बसवून नेले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत आकाश याचा मोबाइल बंद असल्याने त्याची शोधाशोध केल्यानंतर रात्री बारा वाजता गावाजवळ करोली रस्त्यावर इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आकाश याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळाले. आकाश याच्या डोक्यात पाठिमागील बाजूस व पाठिवर धारदार हत्याराने अनेक वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भावासोबत शेती करणारा आकाश हा पैलवान होता. त्याचे काही दिवसापूर्वी गावातील काही जणांसोबत भांडण झाले होते. त्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. आकाश यास दुचाकीवर बसवून नेणारे दोघेजण फरारी असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी गावातील काहिजणांना ताब्यात घेऊन चाैकशी सुरु केली आहे. सोनीत ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीचे दिनकर पाटील विरुद्ध भाजपचे राजू माळी यांच्यात लढत आहे. राष्ट्रवादीचे दिनकर पाटील समर्थक आकाश नरोटे या तरुणाच्या खूनाच्या घटनेमुळे पोलिसांची धावपळ उडाली होती.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.