Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संजय राऊत ही भारत जोडो यात्रेत सहभागी होतील

भाजप ED सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे याचं ताज उदाहरण संजय राऊत आहेत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 11 नोव्हेंबर :- राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्र मध्ये दाखल झालेली आहे. ठीक ठिकाणी या यात्रेला मोठा प्रतिसाद ही मिळतो आहे. भारत जोडो यात्रेची महाराष्ट्रातील दुसरी आणि शेवटची सभा ही बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव मध्ये होणार आहे. यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून या यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. यावेळी नियोजनासाठी आलेल्या काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपला चांगलाच फैलावर घेतल आहे. यावेळी बोलताना भाजप आणि त्याच्या संस्था या अफवा फैलवणाऱ्या संस्था आहेत. स्वातंत्र काळातही त्यांनी अफवा फैलवलेल्या आहे असा थेट आरोप यशोमती ठाकूर यांनी भाजप आणि आरएसएस वर नाव न घेता केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आदित्य ठाकरे त्याचबरोबर संजय राऊत हे भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. असेही त्या म्हणाल्या.. संजय राऊत हा धमक असलेला माणूस असून भाजप ED आणि सरकारी यंत्रणांचा कसा दुरुपयोग करतोय त्याचं ताज उदाहरण म्हणजे संजय राऊतांचे प्रकरण.. असेही त्या म्हणाल्या

राहुल गांधी यांच्याबाबत बोलताना राहुल गांधींच्या भारत जोडे वर सर्वजण बोलत आहेत. राहुल गांधींचा सर्वांनीच अपमान केला आहे. मीडियाने अपमान केला आहे. भाजपने अपमान केला आहे, पंतप्रधानांनीही राहुल गांधींचा अपमान केला आहे. असं म्हणत राहुल गांधी हे देश जोडण्यासाठी निघाले असल्याचं ते म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.