Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतीय नौदलातील पायलट शिवम जाधव यांनी चक्रीवादळात 186 मच्छिमारांना वाचवलं

नौदल प्रमुखांनी घेतली दखल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सातारा डेस्क 22 मे:- तौक्ते चक्रीवादळात सातारच्या सुपुत्राने महत्वपूर्ण कामगिरी केली. पाटण तालुक्यातील सणबुरच्या या सुपुत्राचं नाव शिवम जाधव असं आहे. ते भारतीय नौदलात लेफ्टनंट पायलट पदावर आहेत. त्यांनी नौदलातील आपल्या सहकाऱ्यांसोबत तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या 186 मच्छिमारांचे प्राण वाचवले आहे. यामुळे सातारा जिल्ह्याच्या शौर्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच, शिवमसह त्याच्या आई वडीलांचंही कौतुक केलं आहे.

तौक्ते वादळ मुंबई येथे धडकताच ताशी 120 ते 140 वेगाने वारे वाहत होते. वादळामुळे समुद्रातील जहाजे व मच्छिमारांच्या नौका उलटल्या होत्या. चक्रीवादळामुळे मुंबई येथील अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर अनेक मच्छीमार भयानक वादळात अडकून पडले. काही जहाजावरील कर्मचारी भरकटल्याची खबर मुंबई येथील भारतीय नौदल अधिकार्‍यांना मिळाली. याच वेळी नौदलाचे लेफ्टनंट पायलट शिवम जाधव यांनी आपल्या नौदलातील सहकाऱ्यांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी वादळात अडकलेल्या 186 मच्छिमारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात त्यांना यश आलं. या कामात जहाजावरील पायलट शिवम जाधव यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या कामगिरीचे नौदल प्रमुखांनी व संरक्षणमंत्री यांनी कौतुक केले. या कामगिरीची ग्रामस्थांना माहिती मिळताच शिवम जाधव यांच्यासोबत त्यांचे वडील विठ्ठल जाधव आणि आई संगिता जाधव यांचंही कौतुक करण्यात आलंं आहे

तौक्ते चक्रीवादळात सापडलेल्या 186 मच्छिमारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात लेफ्टनंट पायलट शिवम विठ्ठल जाधव आणि त्यांच्या नौदलातील सहकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका होती. म्हणूनच याची दखल नौदल प्रमुखांपासून संरक्षण मंत्र्यांपर्यंत सर्वांनी घेतली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.