Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गुगलवर सर्च ! सावध रहा !

मिरा-भाईंदर पोलिसांचे आवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मिरा-भाईंदर 13 नोव्हेंबर :- गुगल सर्च करताना सावधानता बाळगण्याचे आवाहन आयुक्तलयाकडून करण्यात आले आहे. सर्व सोशल प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या डिस्काउंट स्कीम, तत्काळ सेवा सुविधा ग्राहकांना वितरित केल्या जातात. या सुविधा घेत असताना पेमेंट करिता वेगवेगळ्या कंपन्यांचे अॅप असून ते सुरक्षित मानले जातात. याचाच फायदा फसवणूक करणारे घेतात व सायबर चोर गुगलवर खोटे हॉटेल, आस्थापनाचे नाव टाकून त्यांच्यासमोर त्यांचा मोबाईल नंबर नमूद करतात.

नागरिकांनी गुगल सर्च केल्यास फसवणूक करणाऱ्यांचा फोन क्रमांक दिसून येतो व हॉटेल बुकिंग चार्जेस, फ्लाईट बुकिंग चार्जेस, करन्सी एक्सचेंज, राहणे-खाने व इतर सुविधा देण्याचे सांगत पैसे उकळले जातात. पैसे मिळतात नंबर बंद करण्यात येतात अथवा सायबर चोरांकडून लिंक पाठवली जाते. त्यामध्ये बँक खात्याचा तपशील Google भरल्यास एप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगून कोड मागितला जातो व पैसे बँकेतून काढत फसवणूक केली जाते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या सर्व फसवणुकी पासून वाचण्यासाठी गुगलचा वापर करून कोणतीही ऑनलाइन बुकिंग करताना संकेतस्थळावरील क्रमांक तपासा, खात्री झाल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नये. मोबाईलचा ताबा घेईल असे स्क्रीन एप्लीकेशन डाउनलोड करू नये, हॉटेल बुकिंग करताना अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा, ओटीपी कोणालाही देऊ नये, असे आवाहन आयुक्त सदानंद दाते यांनी केले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.