Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आलापल्लीत करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षांवर चर्चासत्र

यशस्वीतांचा सत्कार व बक्षीस वितरण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी, 21 जून – ग्लोबल मीडिया इंग्लिश मीडियम स्कूल आलापल्ली येथे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व शारीरिक गुणवत्ता विकासासाठी काल सामान्य ज्ञान स्पर्धा मार्गदर्शकाद्वारे करिअर गायडन्स व विविध शैक्षणिक, क्रीडा विषयक बाबीत प्रावीण मिळविलेल्या गुणवंतांचा सत्कार माजी आमदार दीपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला. करिअर मार्गदर्शन तथा बक्षीस वितरणाचे अध्यक्ष ईश्वरजी वेलादी तथा प्रमुख पाहुणे म्हणून तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ऋषी सुखदेवे उपस्थित होते.

सकाळी 6 वाजता आलापल्ली येथील भामरागड रोडवर मुले व मुलींसाठी तीन गटात मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत सामान्य ज्ञान स्पर्धा तीन गटात सुद्धा घेण्यात आली.यशस्वीत्यांना रोख रक्कम माजी आमदार दीपक दादा यांनी मातापित्यांच्या स्मृती पित्यर्थ दोन गटाला व एका गटाला माजी जिल्हा परिषद सदस्य अनिताताई आत्राम यांच्याकडून तर शील्ड देणगीदारांकडून देण्यात आली.दुपारी12:30 ते 3:30 वाजेपर्यंत राय सर, विनोद दहागावकर, सतीश पनघंटीवार, प्रीतम गग्गुरी यांनी पुढील वाटचालीसाठी दहावी व बारावीनंतर काय?, भविष्यातील रोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञानावर प्रशिक्षण व रोजगाराच्या संधीवर शैक्षणिक मार्गदर्शन केले . यावेळी डॉ सालुजा दाम्पत्य,पत्रकार संघटनेचे सल्लागार सदाशिव माकडे, माजी सरपंच विजय कुसनाके उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सायंकाळी चार वाजता आदिवासी लोकसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित एकदिवशीय कार्यक्रमाचे बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धा परीक्षा व मॅरेथॉन मध्ये प्रथम आलेल्या सोबतच दहावी व बारावी मध्ये गुनाणूक्रमे प्रथम येणारे तसेच महाराष्ट्र स्पोर्ट असोसिएशनचे सचिव तथा प्रशिक्षक कुमार सानू यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव मिळविणाऱ्या विविध खेळाडूंचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतीक गेडाम, रुपेश आत्राम, तिरुपती वेलादी तथा इतर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.