Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माओवाद्यांना सात गावातील नागरिक करणार हद्दपार

भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज हद्दीतील सात (07) गावांनी केली माओवाद्यांना गावबंदी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 16 जुन – जिल्ह्राच्या शेवटच्या टोकावर स्थित असून माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणा­या अबुझमाड परिसराच्या अगदी जवळ असल्याने या गावांमध्ये माओवाद्यांचे वर्चस्व होते. तसेच गावातील काही सदस्यांचा माओवाद्यांना पाठिंबा होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनास त्यांच्यापर्यंत पोहचण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे येथील नागरिक हे शासनाप्रती उदासीन होते. परंतू मागील तीन वर्षामध्ये गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत विविध जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, महिला मेळावे इ. च्या माध्यमातून येथील गावक­यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यात यशस्वी झाल्याने पोलीस दलाच्या प्रती येथील गावक­यांचा विश्वास दृढ झाला.

अलीकडील काळात या परिसरात ईरपनार येथील मोबाईल टॉवरची उभारणी करण्याकरिता आलेल्या कर्मचा­यांच्या वाहणांची माओवाद्यांकडून करण्यात आलेली जाळपोळ व इतर साहित्यांचे कलेले नुकसान, माओवाद्यांकडून पोलीस खब­या असल्याच्या संशयावरुन करण्यात आलेल्या निष्पाप गावक­यांच्या हत्या व मारहाण, नुकसानीच्या विविध घटना, गावांच्या विकास कामात करण्यात येणारा अडथळा, जनतेला दाखविण्यात येणारा धाक घटनांमुळे माओवादी हे जनतेची दिशाभूल करत आहेत हे गावक­यांच्या लक्षात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भामरागड अंतर्गत धोडराज येथे घेण्यात आलेल्या कृषी मेळाव्यामध्ये वरील सात (07) गावातील गावक­यांनी हा नक्षल गावबंदी ठराव संमत केला तसेच यापूढे गावामार्फत कोणत्याही माओवादी संघटनेस जेवन/राशन/पाणी देणार नाही, त्यांना कसल्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही, गावातील नागरिक स्वत: किंवा त्यांच्या मुलाबाळांना माओवादी संघटनेत सहभागी होऊन कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही किंवा त्यांची ट्रेनिंग करणार नाही, माओवाद्यांच्या मिटींगला जाणार नाही तसेच माओवाद्यांना खोट प्रचारास बळी पडणार नाही असे सांगितले. यावेळी मिळदापल्ली येथील गावक­यांनी माओवाद्यांनी पोलीस पथकाला नुकसान पोहचविण्याच्या उद्देशाने खड्डे करुन त्यात पुरुन ठेवलेले धारदार लोखंडी सलाखे काढून आणून पोलीस दलाकडे सुपूर्द केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदरची कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडण्यास उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते व पोस्टे धोडराज येथील प्रभारी अधिकारी शरद काकळीज यांनी महत्वाची भूमिका बजावली. सदर नक्षल गावबंदी ठराव करणा­या सात गावातील नागरिकांचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अभिनंदन केले असून, अबुझमाड जंगल परिसरातील इतर गावातील नागरिकांनीे माओवाद्यांच्या खोट प्रचाराला बळी न पडता स्वत:च्या व गावाच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहावे. गडचिरोली पोलीस दल सदैव तुमच्या पाठीशी असून गडचिरोली जिल्ह्रास माओवादी मुक्त जिल्हा करण्यात अशाच प्रकारची मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.

Comments are closed.