Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सात नगरसेवक अपात्र :

जिल्हाधिकारी यांनी केली कारवाई

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली :  दि. २४ डिसेंबर रोजी अहेरी नगर पंचायतचे  नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सात नगरसेवकांनी सत्ताधारी गटाचे व काँग्रेसचे नेते अजय कंकडालवार यांनी केलेल्या अवैध बांधकामाला समर्थन दिल्याने जिल्हाधिकारी संजय देंने यांनी दि. २४ डिसेंबर रोजी अपात्र घोषित केले.

अहेरी नगर पंचायत मध्ये  मुख्याधिकारी – पदाधिकारी वाद, तर कधी नगरसेवकांची बंडखोरी अशा विविध कारणांमुळे चर्चेत होता. अहेरी नगरपंचायत सभागृहात ऑक्टोबर २०२२ मध्ये सर्वसाधारण सभा पार पडली होतो त्यामध्ये वॉर्ड क्र. १० मध्ये अजय कंकडालवार यांनी नगर भूमापन क्र. ७८० व ७६६ या  सार्वजनिक जागेत अतिक्रमण करून बेकायदेशीररीत्या बांधकाम केल्याचा आरोप केला होता. या बांधकामाला सदर सभेत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सात नगरसेवकांनी समर्थन दिलेले होते व तसा ठरावही पारित केला. त्या बांधकाम ठरावास भाजपच्या नगरसेविका शालिनी संजय पोहनेकर यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत औद्योगिक नागरी अधिनियम १९६५चे कलम ४४ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांकडे डिसेंबर २०२२ मध्ये तक्रार दाखल केली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भाजपच्या नगरसेविका शालिनी संजय पोहनेकर यांच्या आक्षेपावर तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी दि.  १७ जानेवारी २०२३ रोजी  सर्व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे  ऐकून घेतले होते. त्यानंतर  जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणीदरम्यान श्री. कंकडालवार यांना बांधकाम  केलेल्या जागेची कागदपत्रे व परवानगी पत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु कंकडालवार यांनी  सदरची माहिती जिल्हाधिकारी यांना सादर केली नाही.  त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी  मुख्याधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला. मुख्याधिकाऱ्यांनी अजय कंकडालवार यांनी कोणतीही  परवानगी न घेता व अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा अभिप्राय अहवालात दिला होता. सदर अभिप्रायाची दाखल घेऊन दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर जिल्हाधिकारी संजय देंने यांनी २४ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सात नगरसेवकांनी अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्याची भूमिका घेतल्याचा निष्कर्ष नोंदवून अपात्र घोषित केले. त्यांनी अहेरीतील सत्ताधाऱ्यांना हादरा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पुनः परीक्षा रद्द; चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती शिपाई पदाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर

 

सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात  मिळणार प्रवेश ‘खास बाब’ प्रवेश प्रक्रिया कायमची रद्द

मुख्यमंत्री फडणवीस यांना हवंय गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद !

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.