Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरीतील 19 वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार; मेरठचा आरोपी दिल्लीहून अटक..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अहेरी (जि. गडचिरोली) – अहेरी शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 19 वर्षीय स्थानिक युवतीवर मेरठ (उत्तर प्रदेश) येथील 22 वर्षीय शहानवाज मलिक याने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमसंबंध निर्माण करून वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर आरोपीला अलीकडेच दिल्लीहून अटक करण्यात आली असून, सध्या तो अहेरी पोलिस कोठडीत आहे.

इंस्टाग्रामवरून ओळख, प्रेमसंबंध आणि प्रत्यक्ष भेट…

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शहानवाज मलिक (वय 22) हा मेरठ (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी असून, पीडित युवतीशी त्याची ओळख इंस्टाग्रामवर झाली. या ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमसंबंधात झाले. 11 जून 2023 रोजी आरोपीने अहेरी येथे येऊन युवतीची प्रत्यक्ष भेट घेतली. त्या वेळी पीडित मुलगी अल्पवयीन होती.

रूमवर बोलावून वेळोवेळी अत्याचार…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शहानवाजने अहेरीत बांधकाम सेंट्रींगच्या कामासाठी येण्याचा बहाणा करत ठिकाण गाठले. त्या दरम्यान त्याने पीडितेला रूमवर बोलावून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. त्याने अत्याचार करताना पीडितेचे फोटो काढले आणि त्यांना व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दबाव टाकत राहिला.

लग्न न केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी…

पुढे शहानवाजने पीडितेला धमकी दिली की, जर तिने कुणा दुसऱ्यासोबत लग्न करण्याचा प्रयत्न केला, तर तो तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल. बदनामीच्या भीतीने पीडित मुलगी दीर्घकाळ गप्प राहिली.

शेवटी पोलिसात धाव; आरोपी दिल्लीहून अटकेत शेवटी आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने धैर्य करून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपी शहानवाज मलिकला दिल्लीहून अटक केली.

न्यायालयीन कारवाई आरोपीला अहेरी येथे प्रथम दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास 21 एप्रिल 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सदर घटनेचा तपास अहेरी पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

स्थानिकांमध्ये संतापाचा सूर या घटनेमुळे अहेरी शहरात संतापाचे वातावरण आहे. सोशल मीडियावरही आरोपीविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Comments are closed.