Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा

Get real time updates directly on you device, subscribe now.

मुख्यमंत्र्यांना दुसऱ्याही वर्षी शिनेरीवर येण्याचा मिळाला बहुमान

पुणे डेस्क, दि. १९ फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साहाच्या वातावरणात शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना संबंधित नियमांचे पालन करुन शिवरायांना अभिवादन करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार आज, 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सद्या देशात कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी 19 फेब्रुवारी, 2021 रोजीचा “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ना. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवनेरीवरून केले प्रतिपादन.

ना. मुख्यमंत्री म्हणाले दुसऱ्या वर्षीही शिवनेरी किल्ल्यावर येण्याचे बहुमान मिळाल्याने शिवरायांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचे प्रेम लाभले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मनात, ह्रदयात अखंड शिवरायांचे स्थान आहे. त्यांना वंदन करण्यासाठी शिवजयंतीची गरज नाही. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते.

सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरू आहे

छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या

ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, हे विसरू नका

छत्रपती दैवत का आहे ,तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती

कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे

पुरस्कारप्राप्त शिवभक्तांचे अभिनंदन. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत. संपूर्ण जगात शिवरायांचे तेज पसरवणार.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.