Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची उज्ज्वल निकाल परंपरा कायम…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली: शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने यंदाही बारावीच्या विज्ञान शाखेचा निकाल यंदा ९५.६५ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जेचा मान उंचावला आहे.

कु. संजना कालिदास पदा हिने ९०.६७% गुण प्राप्त करत महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला.तर जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. महाविघालयातुन पलाश भास्कर रामटेके व कु. श्रावणी प्रणय खुणे यांनी ७६.६७% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. त्यानंतर कु. सिया मनोज रोहणकर हिने ७२.६७% गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याशिवाय, इतर विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले असून त्यात क्रीश शाहु हुग्गा (७०.८३%), ओजस शीलत डोळस (७०.३३%), आणि कु. यशस्विता एन. पाटील (७०.१७%) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सर्वच विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

गेल्या वर्षी शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावला होता, तर यंदाही तोच यशाचा ध्यास कायम राखत तृतीय क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले आहे. हा घवघवीत यशाचा आलेख कायम राखण्यात महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व व्यवस्थापनाचा मोलाचा वाटा आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.