Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक; अल्पवयीन विद्यार्थीनीच्या विनयभंगांप्रकरणी रायगड जिल्हा परीषदेच्या शिक्षका विरुध्द गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रायगड दि.१२ मार्च : गुरु शिष्य या पवित्र नात्याला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना महाड तालुक्यातील रायगड विभागात घडली आहे. रायगड जिल्हा परीषदेच्या शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकणारी हि पिडीत मुलगी वर्गात एकटी असल्याचा गैर फायदा घेत या नराधम शिक्षकाने मुलीच्या अंगावर हात टाकला.

सदर प्रकरणी पिडीत मुलीने घरच्यांना सांगितल्यानंतर महाड शहर पोलिस ठाण्यात महाडिक या शिक्षका विरोधात बाल संरक्षण कायदा (पोस्को), जाती जमाती अत्याचार विरोधी कायद्यान्वये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन शाळकरी मुलीचा शिक्षकानेच विनयभंग केल्याची दुर्दैवी घटनेचा सर्वस्तरातुन निषेध केला जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.