Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नांदेड, दि. २८ फेब्रुवारी: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील बालक आश्रमात घडली आहे. बालक आश्रमातील अधिक्षकच या घटनेतील आरोपी असल्याने खळबळ उडाली आहे.  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

        नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील आस्था बालक आश्रमातील प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची तक्रार मुदखेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. अधिक्षकच्या या विकृतीला कंटाळून मुलींना पलायन करण्याची वेळ या मुलींवर आली होती. यामुळे  पीडित मुलीने एका मैत्रिणीला घेऊन पलायन करण्याचा निर्णय घेतला.  

        पीडित मुलगी आणि तिची मैत्रीण या दोघींनी २६ फेब्रुवारी रोजी आश्रम शाळेतून पळ काढला. रेल्वेने आदीलाबादकडे निघालेल्या मुलींना किनवट स्थानकावरील रेल्वे पोलिसांनी त्यांची विचारपूस केली. यावेळी पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर किनवट पोलिसांनी मुदखेड पोलिसांकडे विचारपूस करून त्यांच्या स्वाधीन केलं.  

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पोलीस निरीक्षक महेश शर्मा

        मुदखेड पोलिसांनी पीडित मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. आश्रम शाळेतील अधिक्षकानेच अत्याचार केल्याचा जवाब या अल्पवयीन मुलींनी दिला आहे. त्यानुसार विनयभंग आणि पोस्को कायद्या अंतर्गत आरोपी शिवाजी गुंटे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी दिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.