Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपुरातील धक्कादायक घटना; उड्डाण पुलावरून खाली कोसळून दुचाकी स्वाराचा मृत्यू

नागपूरच्या पारडी उड्डाण पुलावर आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

नागपुर, 13 जुले – नागपुरात पुन्हा एकदा उड्डाणपुलावरून खाली कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पारडी उड्डाणपुलावर शनिवारी दुपारी ही घटना घडली. बाईकस्वार तरुण चिखलीवरून पारडीच्या दिशेने जात असताना तीव्र गतीमुळे त्या तरुणाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची दुचाकी उड्डाणपुलाच्या भिंतीला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की या धडकेमुळे दुचाकी पुलावर राहिली, मात्र तो तरुण उड्डाण पुलाखाली कोसळलाय. सुमारे 50 फूट उंचावरून खाली पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं, पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

नागपूर शहरात गेल्या 17 जून पासून ते 8 जुलै म्हणजेच 24 दिवसांच्या कालावधीत 8 भीषण हिट अँड रन अपघाताच्या घटना घडल्या आहे. तर 8 जुलैनंतर गेल्या 48 तासांत दोन वेगवेगळ्या हिट अँड रनच्या घटनांमध्ये 6 जणांनी प्राण गमवावे लागले आहे. यापूर्वीही नागपूरच्या सक्करदरा तसेच सीताबर्डीच्या उड्डाणपुलावरून खाली कोसळून अनेक दुचाकी स्वरांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे नागपूरच्या उड्डाणपुलावरील कमी उंचीच्या संरक्षण भिंती दुचाकी स्वरांसाठी धोकादायक बनल्या असून त्या मृत्यूचे कारण ठरत आहे का? असा प्रश्न या निमित्याने उपस्थित केला जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.