Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तीव्र पोटदुखीमुळे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे लीलावती रुग्णालयात दाखल. ट्वीट करत दिली माहिती .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

 मुंबई डेस्क, दि. १० नोव्हेंबर: राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नुकतंच त्यांनी याबाबतचे ट्विट केलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल, असे ट्वीट मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

Comments are closed.