Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोशल मीडियावर मैत्री करत लाखोंचा गंडा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

धुळे डेस्क 24 जानेवारी:- धुळे शहरात राहणारे शिक्षक संजय शेणपडू देसले याना ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. इलिस मिचेल नामक तरुणीशी सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यानंतर इलिसाने देसले यांच्याशी संपर्क आणि सावध साधला. हि तरुणी देसले याना अमेरिकन सैन्यात असून अफगाणिस्थानात तैनात असताना ४. ३ मिलियनचा खजाना हाती लागल्याचे पटवून देण्यात यशस्वी झाली. आपल्या हिस्स्याला ३० टक्के खजिना आला असून तो मी तुम्हाला पाठवत आहे असे इलिसाने देसले याना एका विडिओ द्वारे सांगितले. या व्हिडिओत नोटांचे बंडल आणि ब्रिटिश कुरियर सेवेची एक पावती दाखवली , ती पावती ई-मेल द्वारे देसले याना पाठवली.

मग देशाला यांना मुंबई हुन फोन आला. मी कस्टम अधिकारी गरिमा देशमुख बोलत असून तुमचे अफगाणिस्थानातून एक पार्सल आले असेच देसले याना सांगण्यात आले. पार्सल सोडविण्यासाठी पैसा भरावे लागतील असे सांगून ३ लाख २७ हजार रुपये देसले यांना पाठवण्यास लावले. पुन्हा पैश्यांची मागणी आल्यावर देसले याना संशय आले त्यांनी चौकशी केली तर गरिमा नावाची अधिकारी नसल्याचे निष्पन्न झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आमिषला बळी पडल्याने देसले याना तब्बल ३ लाख २७ हजारांचा गंडा घातला गेला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत बिहार, दिल्ली आणि मुबई येथे या प्रकारांचे धागेदोरे आढळे आहेत… गुन्हा दाखल झाल्यावर सायबर पोलिस स्टेशनकडून तपासाला सुरूवात झाली आहे. त्यातून इलिस मिचेलच्या नावाने बनावट बँक खाते असल्याचे समोर आले आहे. शिवाय गरिमा देशमुख नावाची एकही महिला कस्टम विभागात कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले. या गुन्ह्यात पोलिसांनी ट्रेस केलेला नंबर मुंबईतील नालासोपारा येथील आहे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.