Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरची तालुक्यातील समस्या तात्काळ मार्गी लावा

गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात बेमुदत चक्काजाम आंदोलन बिरसा ब्रिगेडचा इशारा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची, दि. १६ जुलै : आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात अनेक समस्या मार्गी लावण्यासाठी सर्व पक्षीय तालुका विकास आंदोलन समितीच्या वतीने सन २०११ पासून मोर्चा, बेमुदत चक्का जाम आंदोलन, तालुक्यातील ३० ग्रामपंचायत सरपंचांचे राजीनामे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीवर बहिष्कार टाकले होते.

संपूर्ण समस्या मार्गी लागणार असे आश्वासन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले पण बरेच वर्षे पूर्ण झाली पण एकही समस्या मार्गी लागतील नाहीत. त्यामुळे जिल्हा बिरसा ब्रिगेडने जिल्हा परिषद सदस्य अनिल केरामी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी दिपक सिंगला मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मागण्या पूर्ण न झाल्यास कोरची ते गडचिरोली लाँग मार्च काढून गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात ११ ऑगस्ट पासून बेमुदत चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनातून कोरची तालुक्यातील झेंडेपार, आग्ररी, मसेली, भररीटोला, नांदळी येथील प्रस्तावित लोहखनिज प्रकल्पांना दिलेल्या लीज रद्द करुन या नंतर कधीही कोनत्याही कंपनीला लीज दिली जाणार नाही. असे हमीपत्र लिहून द्यावे, कोरचीला कुरखेडा वरून 18 किमी अंतर व चिचगड वरून 22 किमी अंतर लाईट जंगलातून येत असल्याने कोरची येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असते.

त्यामुळे दोन्ही बाजूंनी येणाऱ्या 33 केव्हि वीज जोडणी ही ऐरीयल बंच केबलने ताबडतोब जोडणी करून द्यावी, कोरची वीज वितरण केंद्र मधील उपकारणे ३० वर्षे जुनी असून ती ताबडतोब बदलण्यात यावी. कोरचीला ३३ केव्ही चिंचगडवरून वीज पुरवठा नियमित सुरू ठेवण्यात यावे.३३ केव्ही वीज वितरण केंद्र ढोलडोंगरी चे काम लवकर पूर्ण करण्यात यावे. १३२ केव्ही कुरखेडा वीज वितरण केंद्र चे काम लवकरात लवकर करून ३३ केव्ही कोरची लाइन वेगळी देण्यात यावे. कोरची हे तालुक्याचे ठिकाण असल्याने कोरची फीडर वेगळा करण्यात यावे,कोरची तालुक्यात BSNL व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कंपनीची दुरसंचार सेवा उपलब्ध नाही भारतात 4G, 5G अशी सेवा उपलब्ध आहे मात्र कोरची तालुक्यात २G सेवाही नियमित देण्यात येत नाही परिणामी डिजिटल इंडिया ऑनलाईन शिक्षण या संकल्पना तालुक्यातील विद्यार्थ्यांचे स्वप्नात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यामुळे BSNL ने तालुक्यात अधिक मनोरे उभे करून दुरसंचार सेवा अधिक बळकट करावी जेणेकरून सर्व प्रकारचे व्यवहार सुरळीत पार पळतील, कोरची तालुक्यात १३३ गावे असून राष्ट्रीय कृत बॅंक ऑफ इंडियाची एकाच शाखा आहे. ती गावा पासून दोन किमी अंतरावर असल्याने जेष्ठ नागरिकांची खूप जास्त गैरसोय होत असल्याने तीला गावात भाड्याने जागा घेऊन स्थानांतरीत करण्यात यावी, कोरची तालुक्यात १३३ गावे असून राष्ट्रीय कृत बॅंक ऑफ इंडिया शकडे फक्त ४० गावे जोडले गेले आहेत.

त्यामुळे उर्वरित गावांना राष्ट्रीय कृत बॅंकेचे व्यवहार करताना खूप अडचणी येतात. त्यामुळे भारतीय स्टेट बँकेच्या नवीन शाखेला परवानगी देण्यात यावी, खरीब हंगामात कोरची तालुक्यात दुष्काळ शासनाने जाहीर केले पण दुष्काळाचे शेतकऱ्यांना कसलाही दिलासा दिला नाही व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली गेली नाही. ती ताबडतोब देण्यात यावे, कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे कृषी पंपाच्या जोडणी साठी केलेल्या अर्जावर ताबडतोब कारवाई करुन वीज जोडणी करावी, असा अनेक समस्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

तसेच ८ ऑगस्ट पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास कोरची ते गडचिरोली काढून 11 ऑगस्टला गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात बेमुदत चक्काजाम आंदोलन करू अशा पद्धतीचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिले असून या निवेदनावर जिल्हा परिषद सदस्य अनिल केरामी, जिल्हा अध्यक्ष बिरसा ब्रिगेड गडचिरोली गोडस वरखडे, उपाध्यक्ष शाम कुळमेथे,सुरज मडावी,भारत कुमरे, उज्ज्वला मडावी जिल्हा अध्यक्ष महीला बिरसा ब्रिगेड गडचिरोली,मोहन कुचरामी उपसरपंच, उत्तम कोरेटी यांच्या सह्या आहेत.

हे देखील वाचा :

गडचिरोली जिल्ह्यात आज 11 कोरोनामुक्त तर 7 नवीन कोरोना बाधित

गोंडवाना विद्यापीठ व माखनलाल चतुर्वेदी विश्वविद्यालय भोपाळ यांच्यात सामंजस्य करार

राजाराम खां. येथे १२० नागरिकांना शिकाऊ वाहनचालक परवाना (License) वितरित

Comments are closed.