Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सर्व विधानसभा मतदार संघाच्या १ जानेवारी, २०२१ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:  

गडचिरोली, दि. २६ नोव्हेंबर: १ जानेवारी ,२०२१ या अर्हता दिनांकावर आधारीत जिल्हातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादिचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षन कार्यक्रम जाहीर केला आहे या कार्यक्रमांतर्गत दि. १७ नोव्हेंबर, २०२० रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असुन या कार्यक्रमाअंतर्गत दि. १५ डिसेंबर, २०२० पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. या कालावधीत मतदार नोंदणी संबंधाने विशेष मोहीमा राबविण्याचे आयोगाचे निर्देश आहेत. या अनुशंगाने दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत पुढिल दिवशी (२ शनिवार आणि २ रविवार) विशेष मोहिमांचा आयोजन करण्यात आले आहे. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि. १५ डिसेंबर, २०२० (मंगळवार) पर्यंत तर विशेष मोहिमांचा कालावधी दि. ०५ डिसेंबर, २०२०(शनिवार) व दि. ०६ डिसेंबर, २०२०, दि. १२ डिसेंबर, २०२०(शनिवार) व दि. १३ डिसेंबर, २०२०

दावे व हरकती जाहिर करणे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

• मतदार नोंदणी नियम,१९६० नियम १६ नुसार प्रत्येक मतदार नोंदणी अधिकारी हे नमुना ९,१०,११ आणि ११ अ मध्ये प्राप्त दावे व हरकतींची यादी तयार करतील आणि अशा याद्यांची एक प्रत त्यांच्या कार्यालयात सुचना फलकावर प्रदर्शित करतील.
• जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या संकेतस्थळावर देखील दावे व हरकतींची यादी उपलब्ध करुन देण्यात येणार. जेणेकरुन सर्व नागरीकांना संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे नोदविलेल्या दावेव हरकतींची माहीती उपलब्ध होऊ शकेल.
• जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी यांनी त्यांचे कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या दावे व हरकतींच्या यादिच्या अनुषंगाने संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे दावे व हरकती नोंदविता येईल याबाबत व्यापक प्रमाणात प्रसार व प्रसिद्धि करन्यात येणार आहे.
• राजकिय पक्षांना लेखी सुचना पाठवुन आणि त्यांची बैठक घेउन त्यांना दावे व हरकतींची माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
• मतदार नोंदणी अधिकारी यांनी दावे व हरकतींची यादी सर्व राजकिय पक्षांना दर आठवड्याला उपलब्ध करुन देतील. या करीता ERO यांनी नियमितपणे सर्व दावे आणि हरकती नोंदविण्यासंबंधी सर्व राजकिय पक्षांची बैठक बोलावुन त्यांना यादी देऊन त्याची पोचपावती घ्यावी अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.