Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शासकीय विमान नाकारले

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

 मुंबई 11 फेब्रुवारी :- मसुरीला कार्यक्रमासाठी निघालेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शासकीय विमानातून उतरवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यपाल आज शासकीय विमानाने देहरादूनला आणि इथून कारने मसुरीला जाणार होते. यासाठी शासकीय विमानाची बुकींग करण्यात आल्याचं राज्यभवनातील सूत्रांनी सांगितलं. मात्र राज्यपाल विमानतळावर जाऊन शासकीय विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. राज्यपाल त्यांनंतर दुपारच्या १२ वाजून १५ मिनिटाच्या स्पाईसजेटच्या विमानाने देहरादूनला रवाना झाले.

मसुरीला IAS प्रशिक्षण समारोप कार्यक्रमासाठी राज्यपाल उद्या हजर राहणार आहेत. त्या कार्यक्रासाठी त्यांना शासकीय विमान हवे होते. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत कोणताही प्रतिसाद आलाच नाही. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.