युवकांमध्ये संविधान जागृतीसाठी राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा; १२ जानेवारीपासून ऑनलाईन प्रशिक्षण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी “संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा २०२५–२६” या राज्यस्तरीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात इयत्ता ८ वी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.
या उपक्रमांतर्गत १५ दिवसांचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार असून, संविधानातील मूल्ये, मूलभूत अधिकार व कर्तव्यांवर भर दिला जाणार आहे. १२ जानेवारीपासून प्रशिक्षणास सुरुवात होणार असून, सहभागी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
स्पर्धेत प्रथम पारितोषिक १ लाख रुपये, द्वितीय ५१ हजार, तृतीय ११ हजार रुपये देण्यात येणार असून, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील. सहभागासाठी ९९ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
नोंदणीसाठी अंतिम तारीख १० जानेवारी २०२६ असून अधिकृत माहिती व नोंदणी www.yuvacareer.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

