Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विविध समस्यांच्या निराकरणसाठी रेव्हेन्यू कॉलनीतील नागरिकांचे नगराध्यक्षांना निवेदन

पिण्याचे पाणी, रस्ते व नाली बांधकाम करण्याची केली मागणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ११ जून: गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील रेव्हेन्यू कॉलनी व फ्रेंड्स कॉलनीतील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी आज दि. ११ जून रोजी वार्डातील नागरिकांनी भाजयुमो चे जिल्हा सचिव निखिल चरडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली च्या नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांना निवेदन देण्यात आले.

कॉलनी मध्ये नळाची पाईपलाईन, रस्ते, नाली नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते या समस्या त्वरीत सोडवण्यासाठी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्याशी चर्चा केली व समस्यांचे निराकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली. याची दखल घेऊन नगराध्यक्षांनी कॉलनीमध्ये ताबडतोब मुरूम, गिट्टी टाकून रस्ता जाण्यायोग्य करून दिला व इतरही समस्या लवकरच दूर करण्याचे आश्वासन दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

                         गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील रेव्हेन्यू कॉलनी

यावेळी भाजयुमोचे जिल्हा सचिव निखिल चरडे, पंकज भांडेकर, अभी उमाटे, श्रीकांत कातरकर, आशुतोष गोरले, साई शिलमवार, तेजस भांडारकर, इंद्रजित शिवरकर, रवी धानोरकर, दुर्योधन ठाकरे,  शाहू पठाण, माणिक केळझरकर, कुणाल गोवर्धन, महिंद्र शिलमवार, युवा मोर्चा चे गणेश नेते उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

गोविंदपूर नाल्यावरील पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करा – खा. अशोक नेते

आलापल्ली-सिरोंचा रस्त्याची चौकशी करुन दोषींवर गुन्हा दाखल करा – संतोष ताटीकोंडावार यांचे जिल्हाधिका-यांना निवेदन

जिल्ह्यात कोविड बाबत नियमावली आणि उपाययोजना १४ जूननंतरही राहणार सुरु

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.