Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘‘चला मैत्री करू या’’ उपक्रमाद्वारे छल्लेवाड्यातील विद्यार्थ्यांनी साधला असरअलीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद

Get real time updates directly on you device, subscribe now.

मिलिंद खोंड, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. १८ मार्च: विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी व ईतरांशी समजपुर्वक संभाषण करण्याच्या हेतूने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा छल्लेवाडा येथील शिक्षकांनी “चला मैत्री करु या” हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वाचन, लेखन, श्रवण, भाषण या सोबतच संभाषण कौशल्य विकसित करणे हा सूध्दा शिक्षणाचा महत्त्वाचा ध्येय आहे. “चला मैत्री करु या” या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद केंद्र शाळा आसरअल्लीच्या बालकलाकार व राज्य स्तरीय भाषण स्पर्धेत सहभागी कु. श्रुती राजन्ना गुर्ला ह्या विद्यार्थीनीची मोबाईल द्वारे मुलाखत घेऊन तीच्याशी मनसोक्त सुसंवाद साधला.

 ह्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संभाषण करण्याची संधीही मीळेल व त्यांच्या आत्मविश्वासही वाढेल. जि. प. उच्च प्राथ. शाळा छल्लेवाडा ही शाळा दुर्गम भागात असुनही विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी धडपडत असते. नेहमी तालुका, जिल्हा राज्य स्तरीय आँनलाईन उपक्रमात सहभागी होते. तसेच शाळेबाहेरची शाळा या आकाशवाणी केंद्र नागपूर ने विद्यार्थीनीशी साधलेला संवाद उत्कृष्ट होता. यात रक्षा गुरनुले, स्नेहा धरावत, किर्ती ओशाके, श्रीनिवास चव्हाण, केतन निकोडे आदी विद्यार्थ्यांनी संवाद साधला व शैक्षणिक मैत्री केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या उपक्रमांसाठी उपक्रमशिक्षक सुरजलाल येलमुले, कल्पना रागीवार पदवीधर शिक्षिका, समय्या चौधरी, सामा सिडाम मुख्याध्यापक, बाबुराव कोडापे, राजेंद्र दहिफळे, मुसली जुमडे व केंद्र प्रमुख सुनिल आईंचवार तसेच असरअली शाळेचे मुख्याध्यापक खुर्शिद शेख, श्रीनिवास रंगू, सुरेश चुधरी, महेंद्र वैद्य, विजय कलकोटवार, प्रतिभा बंडगर व शा. व्य. समितीचे नियमित मार्गदर्शन लाभले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.