सुदर्शन केमिकल्सला ‘सीएसआर अवॉर्ड-२०२३’ प्रदान
राज्यपाल बैस, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 24 एप्रिल : सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, पर्यावरण क्षेत्रात सीएसआरच्या माध्यमातून भरीव योगदान दिल्याबद्दल सुदर्शन केमिकल्सचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘सीएसआर अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. सुदर्शन केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक राजेश राठी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मुंबईतील राजभवनच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, हिंदुजा ग्रुपचे चेअरमन शोम हिंदुजा आदी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीएसआर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना सन्मानित करण्यात आले.राजेश राठी म्हणाले, “हा सन्मान ‘सीएसआर’च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचा आहे. सुदर्शन केमिकल्स ‘सीएसआर’च्या माध्यमातून रोहा व महाड या उत्पादन केंद्रांसह सुतारवाडीतील संशोधन व विकास केंद्र.
हे पण वाचा :-
Comments are closed.