Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सर्वोच्च न्यायालयाची तारीख पे तारीख

४ आठवड्यानी लेखी स्वरूपात युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर :-  महाराष्ट्र विधानसभेच्या १६ आमदारांच्या निलंबनावर आज सर्वोच्च न्यायालयात कोणताही युक्तिवाद न होता दोन्ही बाजूंच्या वकिलांना निर्देश देत ४ आठवड्यानी म्हणजे २९ नोव्हेंबर ची तारीख पुढील सुनावणीसाठी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिली.

पक्षांतर बंदीच्या कायद्याचे उल्लंघन केले आहे असे म्हणत १६ आमदारांचे निलंबन करावे अशी याचिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई, आणि विधिमंडळ पक्ष प्रतोद सुनिल प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती, या केस संदर्भातील अशा प्रकारच्या अन्य सर्व याचिकाची सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या संदर्भात निर्देश देतांना सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकिलांना समोरासमोर बसून कोण कुठल्या मुद्यावर युक्तिवाद करणार हे ठरवावे. सोबत पुराव्यांची यादी सादर करावी, दोन दोन वकिलांनी संपूर्ण गोषवारा तयार करून आपला युक्तिवाद लेखी स्वरूपात सादर करावा. या सर्व गोष्टी ऐकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ४ आठवड्यानी म्हणजे २९ नोव्हेंबर रोजी पुढील तारीख ठेवली आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.