Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिक्षकांनी स्वयंप्रेरित होऊन शिक्षण प्रणाली अंगीकारावी.

मुख्याध्यापक व शिक्षकांची गुणवत्ता विकास कार्यशाळा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, 6 ऑगस्ट 2023 : आदिवासी विकास विभागाअंतर्गत चालणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळांतील शिक्षक तथा मुख्याध्यापकांनी भविष्यवेधीतील तंत्रे व पायऱ्यांची अंमलबजावणी करावी.यातून स्वयंप्रेरित होऊन आदिवासी, गरीब विद्यार्थ्यांना उत्कृष्ट नागरिक, विज्ञाननिष्ठ व ज्ञानलालसा घेणारे व्यक्तिमत्व घडविण्याचे आवाहन स्थानिक एकलव्य निवासी शाळेत विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती व गुणवत्ता विकास कार्यशाळेच्या प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून नागपूर आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी केले.

कार्यशाळेतील मंचावर सहाय्यक प्रकल्पाधिकारी प्रेमराव लोखंडे, सुहास वसावे, शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यभान डोंगरे उपस्थित होते. पुढे ठाकरे म्हणाले,अध्यापनकर्त्या शिक्षक व मुख्याध्यापकांनी भविष्य वेधी शिक्षण प्रणालीतील तंत्र व पायऱ्यांचा अवलंब करावा. मुख्याध्यापकांनी जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करावा, विषयमित्र, सुलभक व इतर मार्गाणे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांत न्यूनगंड दूर करून आत्मविश्वास निर्माण करावा, क्षमता ओळखून आव्हाने निर्माण करावीत असे म्हणाले. यावेळी आश्रम शाळांच्या मुख्याध्यापकांना आपापली मते, अनुभव विद्यार्थी विकासात आपले दिलेले योगदान, एप्रिल 2022 मध्ये सहलीतील खराशी येथील उत्कृष्ट शाळेला भेट दिल्यानंतर आपल्या झालेले व केलेले बदल कथन करण्यास अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. आपली शाळा उत्कृष्ट शाळा विकसित करण्याचा संकल्प प्रत्येक घटकाने करण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यातील आदिवासी, शेतकरी मजुरांच्या विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना ओळखून, विभागातील सूर्यवंशी नामक शिक्षकाने विद्यार्थ्यांना दिलेली आव्हाने पूर्ण करण्यास केलेले प्रयत्न प्रत्येक शिक्षकाने अंगिकारावे असे त्यांनी सांगितले.आदिवासी विकास विभागाच्या जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांना व शाळांना दोन दिवशीय भेट देऊन विद्यार्थ्यांत जिज्ञासू वृत्ती प्रेरित करण्यासाठी शिक्षक व मुख्याध्यापकांना यावेळी अपरायुक्ताने मार्गदर्शन केले. कार्यशाळेला शासकीय व अनुदानित आश्रम शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते.कार्यशाळेचे संचालन शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यभान डोंगरे यांनी केले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.