Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तेंदूपत्ता कंत्राटदारांनी बुडविला शेकडो कोटींचा जीएसटी महसूल

Get real time updates directly on you device, subscribe now.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जीएसटी महसूलाची रक्कम वसूली करीता याचिका दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २७ मार्च: गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख व्यापार असलेल्या तेंदूपत्ता व्यवसायापोटी कंत्राटदारांनी अठरा टक्के जीएसटी महसूलाची रक्कम शासनाला अदा करायची असतांना मात्र नाममात्र जीएसटी भरुन शासनाचा शेकडो कोटींचा महसूल तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून बुडविला गेला असल्याने आता याविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जीएसटी महसूलाची रक्कम वसूली करीता याचिका दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभा आणि वनविभागाच्या मार्फत तेंदूपत्त्याच्या निविदा काढून कंत्राटदारांकडून तेंदूपत्ता खरेदी केला जातो. या खरेदी पोटी कंत्राटदारांकडून अठरा टक्के जीएसटी महसूलाची रक्कम शासनाला अदा करण्यात यावी असा नियम आहे. मात्र शासनाचे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आणि सरकारचे अभय असल्याने तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून सदर जीएसटी महसूलाची रक्कम शासनाला अदाच केली जात नसल्याची परिस्थिती लक्षात घेऊन याबाबतचे अभ्यास असलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याने आता या गैरप्रकारांविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्याची तयारी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात साधारणपणे दिड लाख प्रमाणित गोणी करीता निविदा काढून तेंदूपत्त्याची शासन आणि ग्रामसभा कंत्राटदारांना तेंदूपत्ता विक्री करतात. यापोटी किमान वीस कोटी रुपयांची जीएसटी महसूल शासनाला कंत्राटदारांकडून अदा होणे अपेक्षित असताना एक – दोन कोटींचाही महसूल शासनाला अदा केला जात नसल्याची माहिती आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्ह्यात मागील पाच ते सहा वर्षांपासून शेकडो कोटींचा जीएसटी महसूल जबरीने वसूल करावा यासाठी ही याचिका दाखल होणार असून सोबतच ग्रामसभांचे आर्थिक हिशेब शासनाच्या संबंधित विभागाने तपासणी करावी, कंत्राटदार आणि त्यांना कर चोरीला मदत करणाऱ्या शासकीय विभागांचे अधिकारी आणि ग्रामसभा पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावे अशीही मागणी या याचिकेत करण्यात येणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.