Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तारापूर औद्योगिक परिसरात भीषण स्फोट

३ जण मृत्यू तर १२ जखमी जखमींमध्ये एकाची प्रकृती गंभीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर, 27, ऑक्टोबर :-  पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक परिसरात काल एका कारखान्यात भीषण स्फोट होवून ३ जण मृत्युमुखी तर १२ जण गंभीर झाले असून त्यातील १ जण अत्यवस्थ आहे

तारापूर औद्योगिक परिसरातील बी. भगोरिया इंडस्ट्रीज प्रा.लि. या कारखान्यात गामा एक्ससाईड केमिकल ची प्रक्रिया सुरू असताना प्रचंड स्फोट होऊन ३ कामगारांचा मृत्यू झाला, व १२ जण जखमी झाले आहेत.मृत कामगारांची नावे अशी आहेत. गोपाळ सिसोदिया, पंकज यादव, सिकंदर गोस्वामी .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हा स्फोट एवढा भयानक होता की ४-५ किलोमीटरच्या परिसरात या स्फोटाने हादरे बसले. प्रचंड वायू गळती आणि मलबाचा ढिगारा यामुळे शोध कार्यात अडथळे येत होते. अपघात झाल्यावर तातडीने अग्निशमन दल, आजूबाजूच्या कारखान्यातील सुरक्षा अधिकारी, पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन वायुगळती आणि कामगारांना युद्ध पातळीवर बाहेर काढण्याचे काम सुरू केले.

बोईसर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अजित कसबे यांनी सांगितले की प्रेशर वाढीने हा स्फोट झाला. पालघरचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे. प्राप्त माहितीनुसार १८ कर्मचारी कामावर होते. स्फोट होऊनही आरोग्य संचलनालय , तसेच फॅक्टरी अधिकारी घटनास्थळी पोहचले नव्हते. अकुशल कामगार व उत्पादन प्रशिक्षशीत नसलेले कर्मचारी यामुळे हा स्फोट झाला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.