Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा बाविसावा दीक्षांत सोहळा दिमाखात संपन्न

सकारात्मकता, रुग्णांशी सुसंवाद आणि सामाजिक बांधिलकी जपावी-कुलपती नामदार गिरीश महाजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नाशिक 13 फेब्रुवारी :- आरोग्य शास्त्राच्या सर्वच विद्यार्थ्यांनी सकारात्मकता, रुग्णांशी सुसंवाद आणि सामाजिक बांधिलकी जपावी असे प्रतिपादन विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास आणि पंचायती राज, क्रीडा व युवक कल्याण खात्याचे मंत्री मा.नामदार  गिरीश महाजन यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा बाविसावा दीक्षान्त समारंभ मा. वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या समारंभास सन्माननीय अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आंतरविद्याशाखीय आरोग्य विज्ञान विद्यालयाचे प्राध्यापक डॉ. भुषण पटवर्धन उपस्थित होते समवेत व्यासपीठावर मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प, अ.वि.से.प., वि.से.प, मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. अजित गोपछडे, डॉ. सुरेश पाटणकर, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही. कळसकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात मा. वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार गिरीश महाजन यांनी सांगितले की, आरोग्य क्षेत्रातील काम हे निश्चितच आव्हानात्मक असेल यासाठी या क्षेत्रात कार्यरत सर्वांनीच सकारात्मतेची जोपासना करावी असे सांगितले. डॉक्टर आणि रुग्ण त्यांचे नातेवाईक यामध्ये होणारे कटूप्रसंग टाळण्यासाठी उत्तम संवाद राखणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. आरोग्य सेवेमध्ये रुग्णासमवेत सामाजिक बांधिलकीची जोपासणा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, शासनामार्फत  आरोग्यविषयक जनजागृती उपक्रमांचे आयोजन केले जाते. समाजहिताच्या या उपक्रमांमध्ये तरुणांनी सक्रीय सहभाग नोंदविला पाहिजे असे त्यांनी सांगितले. या सर्व गोष्टींबरोबर स्वतःच्या आरोग्याची जपणूक करण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या कर्मचायांचे प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत समस्या सोडविण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल असे त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रसंगी कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आंतरविद्याशाखीय आरोग्य विज्ञान विद्यालयाचे प्राध्यापक डॉ. भुषण पटवर्धन यांनी सांगितले की, आपल्या देशात साथीच्या रोगांचे प्रमाण अधिक होते मात्र सध्या लाईफस्टाईलमुळे उद्भवणाÚया आजारांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. पाश्चिमात्यांचे अंधानुकरण केल्याने त्यांच्या चांगल्या सवयी न घेता अयोग्य गोष्टी घेतल्यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. या आजारांवर एकच पॅथीकडे उपचार नाही. सर्वच उपचार पध्दतींमधील वेगवेगळया गोष्टींचा समुच्चय करुन समाजाला मोठया प्रमाणात वाढणाया या आजारांवर मात करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आरोग्य शास्त्राच्या विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता जागृत होणे हे महत्वाचे असते.जगातील अनेक मोठया देशांमध्ये आरोग्य व्यवस्था धोक्यात आलेली आहे. आपल्या सारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशासाठी फॅमिली फिजिशियनची संकल्पना अधिक महत्वपूर्ण ठरणारी असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य विद्यापीठाचे कार्य प्रशंसनीय असल्याचे त्यांनी सांगून विद्यापीठ राष्ट्रीय स्तरावर रोल मॉडेल होईल असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी विद्यापीठ अहवाल सादर करतांना विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षातील दीक्षांत समारंभात विद्यापीठाची वाटचाल तंत्रज्ञान व प्रगतीच्या दिशेने सुरु आहे. व्हिजन डॉक्यमेंटनुसार विद्यापीठात विविध संस्थासमवेत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. विद्यापीठाने नुकताच सी-डॅक, ओमनीक्युरस आदी संस्थासमवेत सामंजस्य करार केला आहे. विद्यापीठाने तंत्रज्ञानाचा व सॉफ्टवेअरचा वापर कामकाजात मोठया प्रमाणात केला असून परीक्षेनंतर एक दिवसात परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे. विद्यापीठाचा परिसर ग्रीन कॅम्पस उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले आहे. तसेच विद्यापीठ परिसारात प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. रेनवॉटर हार्वस्टींगचा करीता प्रयत्न करण्यात येत आहेत. विद्यापीठाने समर इंटरशिप प्रोगाम सुरु केला असून विद्यार्थ्यांना त्याचा मोठया प्रमाणात उपयोग होत आहे. विद्यापीठ परिसरात ‘इक्षणा’ म्युझियम साकारण्यात येत असून आरोग्य व तंत्रज्ञानाचा वापर करुन ते अद्ययावत करण्यात येत आहे. विद्यापीठाकडून विविध संशोधन उपक्रम राबिविण्यात येत असून ‘मालेगांव मॅजिक’ हा संशोधन उपक्रमाचा भाग आहे. दूर्गम भागातील लोकांची आरोग्य सेवा व त्याबाबत कार्य करण्यासाठी ‘ब्लॉसम’ उपक्रमाची सुरवात विदर्भात करण्यात आली असून नाशिक जिल्हयात त्याचा प्रारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्या पुढे म्हणाल्या की, अवयवदान, रक्तदान आदीबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे यासाठी विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. विद्यापीठाचे वैद्यकीय पदव्युत्तर पदवी व संशोधन संस्थेत 52 विद्यार्थी प्रवेशित झाले असून यामुळे नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची संख्या वाढली आहे. सेंटर फॉर एक्सलन्स करीता विद्यापीठाकडून मोठया प्रमाणात काम सुरु आहे. विद्यापीठात परीक्षेच्या उत्तरपत्रिका स्कॅन करुन ऑनलाईन पध्दतीने गुणांकन करण्यात येते यामुळे निकाल घोषित करण्यासाठी लागणाया वेळेची बचत झाली आहे. तंत्रज्ञानामुळे विद्यापीठातील कामाची गती वाढली आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधनाकरीता चेअर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात आली असून संशोधन व तंत्रज्ञानावर अधिक भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचा बाविसावा दीक्षांत समारंभ विद्यापीठ आवारातील शिक्षण प्रशिक्षण प्रबोधिनीत सकाळी 11.00 वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने प्रारंभ झाला. विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 12727 स्नतकांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना 96 विद्यार्थ्यांना 124 सुवर्णपदक, एक विद्यार्थ्यास रोखरक्कम पारितोषिक व संशोधन पूर्ण केलेल्या 17 विद्यार्थ्यांना पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली.

आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे 237, दंत विद्याशाखा पदवीचे 2108, आयुर्वेद विद्याशाखेचे 3392, युनानी विद्याशाखेचे 339, होमिओपॅथी विद्याशाखेचे 2145, बेसिक बी.एस्सी. नर्सिंग 1957, पीबी बी.एस्सी. नर्सिंग विद्याशाखेचे 213, बी.पी.टी.एच. विद्याशाखेचे 193, बी.ओ.टी.एच. विद्याशाखेचे 23, बी.पी.ओ. विद्याशाखेचे 01 तसेच पदव्युत्तर विद्याशाखेमध्ये एम.डी.मेडिकल विद्याशाखेचे 257, पी. जी. दंत 482, पी.जी. आयुर्वेद 42, पी.जी. होमिओपॅथी 227, पी.जी. युनानी 01, पी.जी. डी.एम.एल.टी. 91, पॅरामेडिकल 717, पी.जी. अलाईड (तत्सम) 158 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमात परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. या समारंभास विद्यापीठ विद्यापीठ विद्याशाखांचे अधिष्ठाता विविध प्राधिकरण सदस्य, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.